धारगळ, तोर्से भागात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हरमलः धारगळ दाडाचीवाडी येथील खळभाट आणि धनगरवाडा तोरसे, येथील पावसाळी भुईमूग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाळी भुईमूग लागवडीसाठी चांगल्या प्रतीचे भुईमूग बियाणे उपलब्ध करण्यासंदर्भात तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
भुईमूग पिकाची रानटी जनावरांपासून नासाडी होऊ नये यावर तोडगा म्हणून कम्युनिटी फार्मिंग योजनेअंतर्गत भोवताली कुंपण करणे तसेच विहीर खोदून वर्षाला दोन ते तीन पिके घेऊन शेतकऱ्यांचा नफा वाढवता येईल असेही सांगितले. सर्व शेतकऱ्यांनी या कामाला कृषी अधिकाऱ्यांना पाठिंबा दिला.
यावेळी नॅशनल फूड सेक्युरिटी मिशन योजनेअंतर्गत मोफत अळसांदे बियाणे दिलेल्या खळभाट धारगळ येथील शेतकऱ्यांची शेतजमीन पाहणी करण्यात आली व त्यांना मार्गदर्शन केले. ह्या मार्गदर्शन कार्यक्रमास पेडणे सहाय्यक कृषी अधिकारी, धीरज परब तसेच वैभवी देसाई आणि पल्लवी शेट्ये कृषी अधिकारी, कृषी संचालनालय, पणजी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांना शेती विषयीचे मोलाचे मार्गदर्शन केले.