बेरूत : आज ७ ऑक्टोबर २०२४. गेल्या वर्षी याच दिवशी हमासने इस्रायलमध्ये सुरू असलेल्या एका म्यूजिक कॉन्सर्टवर अतिरेकी हल्ला केला. यात ७००च्या आसपास लोक मरण पावले तर अनेकांना ओलिस ठेवले गेले. इस्रायलने याचा घटनेचा प्रतीशोध घेत या भीषण हल्ल्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तीस यमसदनी पाठवले. इस्रायलकहा हा लढा अजूनही सुरूच आहे. यादरम्यान मोसाद आणि आयडीएफच्या जोडगोळीने हमास, हिजबुल्लाह आणि इराणमधील अनेक रथी महारथींचा खात्मा केला आहे.
दरम्यान आज त्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने इस्रायलने गाझापट्टी तसेच लेबनॉनवर धडाधड क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने हे हल्ले हिजबुल्लाहचे कमांड सेंटर, शस्त्रास्त्रे, बोगदे आणि त्याच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून केले आहेत. यात बेरूत शहर बेचिराख झाले असून येथील लोक सिरियात जाण्याच्या प्रयत्नात आहेत. सर्वत्र भयाण शांतता पसरल्याचे सोशल मिडियावर पोस्ट करण्यात येणाऱ्या व्हिडिओंमधून दिसत आहे.
इकडे हिजबुल्लाहने काल रात्री इस्रायलच्या हैफा शहरावरही रॉकेट डागले. इस्रायलने हे हल्ले वेळीच थांबवले. पण काही रॉकेट रहिवासी भागातही पडले व यात ६ जण जखमी झाले. इमारतींचेही नुकसान झाले आहे. हमासच्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नेतन्याहू यांनी रविवारी उत्तर सीमेवरील IDF तळाला भेट दिली. येथे त्यांनी नॉर्दर्न कमांडच्या प्रमुखांसह आयडीएफ सैनिकांची भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. नॉर्दर्न कमांड क्षेत्रातूनच हिजबुल्लाहवर हल्ले केले जातात.
दरम्यान समोर आलेल्या महितीनुसार, इराणने काल सायंकाळी पश्चिम पूर्व भागांत अणुबॉम्बची भूमिगत चाचणी घेतली. जमिनीतून जाणवलेल्या कंपनामुळे रिश्टर स्केलवर याची ४.६ रिश्टर इतकी तीव्रता जाणवली.
महत्त्वाचे म्हणजे गाझा-इस्रायल, लेबनॉन आणि सिरिया हे देश वालुकामय खडकापासून बनलेल्या टेक्टोनिक प्लेटचा भाग आहे ज्याचे निर्माण अवघ्या २ कोटी वर्षांपूर्वी झाले. जर इराणने काही खुसपट काढून या भूमिगत अणुबॉम्बची क्षमता वाढवत त्याचा इस्रायलवर वापर केला तर वरील तीन-चार देश क्षणात जमिनीत गुडूप होतील. इतकेच नाही तर याचा फटका आफ्रिकेच्या टेक्टोनिक प्लेटला गंभीररीत्या बसेल. युरोपच्या प्लेटवर देखील याचा गंभीर परिणाम होईल.