माजी सैनिकांसाठी थेट भरतीद्वारे दोन टक्के राखीवता कायम

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th September 2024, 01:01 am
माजी सैनिकांसाठी थेट भरतीद्वारे दोन टक्के राखीवता कायम

पणजी : ‘क’ गटातील सरकारी नोकऱ्यांच्या पदांत माजी सैनिकांसाठी थेट भरतीद्वारे दोन टक्के राखीवता कायम करण्यात आली आहे. याशिवाय सरकारी सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांना १५ वर्षांचा रहिवासी दाखला अनिवार्य करण्यात आला आहे.
गृह खात्याचे अवर सचिव मंथन नाईक यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. ‘क’ गटातील माजी सैनिकांची दोन टक्के पदे भरताना १५ वर्षांच्या रहिवासाची अट आहे. परंतु ही अट पूर्ण करणारे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास पाच वर्षे गोव्याचे रहिवासी असलेल्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. माजी सैनिकांना सरकारी नोकऱ्यांच्या ‘क’ गटातील पदांमध्ये थेट भरतीद्वारे राखीवता देण्यात आली आहे. ही राखीवता यापुढेही कायम राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.       

हेही वाचा