डेडपूल-वूल्व्हरिनचे नवे मिशन!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th July, 12:14 am
डेडपूल-वूल्व्हरिनचे नवे मिशन!

विक्रम भट्टच्या हॉरर थ्रिलर ब्लडी इश्कपासून मनोज बाजपेयींच्या ॲक्शन थ्रिलर भैय्या जीपर्यंत, आमच्याकडे शुक्रवारी डिझ्ने + हॉटस्टार, नेटफ्लिक्स, झी ५ वर दाखल होत आहेत. तसेच या यादीमध्ये चटनी सांबार नावाची तमिळ कॉमेडी मालिका, नेटफ्लिक्सचा नवीन ऐतिहासिक चित्रपट हाऊस ऑफ गाआ प्रदर्शित होणार आहेत. या शिवाय आपल्याला डेडपूल आणि वूल्व्हरिन यांचे एकत्रित मिशन आपल्याला चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे.


डेडपूल अँड वूल्व्हरिन (थिएटर्स)
डेडपूलच्या या भागात व्हॉल्व्हरिनची एन्ट्री झाली आहे. रायन रेनॉल्ड्स दिग्दर्शित हा चित्रपट डेडपूलभोवती फिरतो, ज्याला टाइम व्हेरिअन्स अथॉरिटीने एका धोकादायक मिशनसाठी भरती केले आहे जो एमसीयूचा संपूर्ण इतिहास बदलून टाकू शकतो. मात्र हे त्याचे एकट्याचे मिशन नाही; त्याला वूल्व्हरिन (ह्यू जॅकमनने खेळवलेले) सोबत काम करण्यास भाग पाडले जाते.


ब्लडी इश्क (डिस्नी+ हॉटस्टार)
हा एक थ्रिलर भयपट आहे. एका भयंकर अपघातामुळे एक तरुणी एका निर्जन बेटावर जाते. मात्र स्मृती गमावल्यामुळे ती स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करत असते. बेटाची काही गडद रहस्ये आहेत. ज्यामुळे तिचे साधे जीवन एक भयानक स्वप्न बनते. विक्रम भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात अविका गोर, वर्धन पुरी आणि जेनिफर पिकिनाटो यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


विच ब्रिंग मी टू यू (जीओ सिनेमा)
या वीकेंडला आपल्या जोडीदारासोबत पाहण्यासाठी हा एक परिपूर्ण रोमँटिक चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत लुसी हेल ​​आणि नॅट वुल्फ आहेत. हा चित्रपट दोन रोमँटिक गोष्टींवर केंद्रित आहे. हा चित्रपट स्टीव्ह अल्मंड आणि ज्युलियाना बॅगॉट यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत आहे.


एलिट सीझन ८ (नेटफ्लिक्स)
या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या नवीन ओटीटी मालिकांमध्ये एलिट सीझन ८ चा समावेश आहे. ही स्पॅनिश मालिका किशोरवयीन मुलांच्या भोवती फिरते जी वरिष्ठ वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गटावर केंद्रित आहे ज्यांच्या मैत्रीची पदवी जवळ आल्यावर वेगळे वळण घेते.


हाऊस ऑफ गा (नेटफ्लिक्स)
हाऊस ऑफ गाआ हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे, जो एका निर्दयी आणि महत्वाकांक्षी राजकीय नेत्याभोवती फिरतो. ज्याचे एकमेव ध्येय आहे अफाट शक्ती मिळवणे आणि त्याने देशातील सर्वात महत्वाची व्यक्ती बनण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे.


रायन (थिएटर्स)
या चित्रपटात धनूष चार रुपांमध्ये दिसणार आहे. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय. चित्रपटाचे कथानक एका साध्या माणसाभोवती फिरते जो आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये दोन हात करतो.


नॉशटोनर २ (होइचोई)
ही एक बंगाली मालिका आहे. जी पूर्वीचा भाग जिथे संपला तिथून सुरू होते. नवीन सीझन अपर्णावर केंद्रित आहे. जिच्या आधीच त्रासलेल्या वैवाहिक जीवनात अनपेक्षित वळण येते जेव्हा तिला तिच्या गर्भधारणेबद्दल कळते. जेव्हा तिच्या भूतकाळातील एक गूढ स्त्री तिच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा मालिका अधिक गडद वळण घेते.
ड्रॅगन प्रिन्स सीझन ६ (नेटफ्लिक्स)
ॲनिमेटेड मालिका, ड्रॅगन प्रिन्स आपल्या नवीन सीझनसह परतली आहे. नवीन भाग प्रिन्स कॅलमवर लक्ष केंद्रित करतील, जो मानव, ड्रॅगन आणि एल्व्ह यांच्यातील हजारो वर्षांचा संघर्ष संपवण्यासाठी धोकादायक मोहिमेवर जाण्यासाठी रायलासोबत काम करतो. हे दोघे त्यांच्या ध्येयात यशस्वी होतील का, हे आपल्याला मालिका पाहिल्यावर कळेल.


भैय्या जी (झी ५)
मनोज बाजपेयीची मुख्य भूमिका असलेला, भैय्या जी हा थ्रिल, ड्रामा आणि ॲक्शन-पॅक चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक एका गुन्हेगाराभोवती केंद्रित आहे. ज्याच्या भावाची हत्या झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा शस्त्र उचलण्यास भाग पाडले जाते.


चटनी सांबर (डिस्नी+ हॉटस्टार)

ही एक तमिळ मालिका आहे. जी एका अनाथ रस्त्यावर फिरणाऱ्या विक्रेत्याची कथा सांगते. ज्याच्या जीवनात धक्कादायक वळण येते जेव्हा तो आपल्या श्रीमंत सावत्र भावासोबत हवेलीत जातो. कुटुंबातील इतर सदस्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करताना त्याला नवीन जीवनाशी जुळवून घेताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या मालिकेत योगी बाबू, चंद्रन आणि वाणी भोजने मुख्य भूमिकेत आहेत.