कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा व अभिनेत्री पवित्रा गौडावर खुनाचा आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th June, 04:19 pm
कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा व अभिनेत्री पवित्रा गौडावर खुनाचा आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात.

बेंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याला बेंगळुरू पोलिसांनी हत्येच्या आरोपात ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसांनी म्हैसूरमधून ताब्यात घेतले असून आता त्याला बेंगळुरूला आणण्यात आले आहे. एका खून प्रकरणातील आरोपीने तपासणी दरम्यान दर्शनचे नाव उघड केले असून  पोलिसांइनपुटच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. दर्शन हा आरोपीच्या सतत संपर्कात होता, असा आरोप आहे. दरम्यान दर्शन थुगुडेपाला ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या काहीच तासांत अभिनेत्री पवित्रा गौडाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नेमके प्रकरण काय ? 

बेंगळुरू शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना एका हत्येप्रकरणी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रदुर्गातील रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्वामी हा चित्रदुर्गातील एका मेडिकल दुकानात असिस्टंट होते आणि नुकतेच लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे प्रथम चित्रदुर्ग येथून अपहरण करून शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षीपल्य येथे हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह नाल्यातून सापडला असून शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. 

समोर आलेल्या माहितीनुसार; रेणुका स्वामी हा पवित्रा गौडाला अश्लील मेसेज पाठवत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पवित्राने ही गोष्ट दर्शनच्या कानावर घातली. पुढे दर्शन व त्याच्या ८ साथीदारांनी स्वामीची हत्या केली. 

“कन्नड अभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप तपास सुरू असल्याने आम्ही जास्त माहिती देऊ शकत नाही,” असे बेंगळुरू पोलिसांनी सांगितले; सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

२०११  मध्ये दर्शनच्या पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता.  १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. २०१६ मध्येही दर्शनच्या पत्नीने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. २०२१ मध्ये, दर्शनवर म्हैसूरमधील हॉटेलमध्ये एकास मारहाण केल्याचा आरोप झाला होता. दरम्यान पुन्हा २०२४  मध्ये त्याची अभिनेत्री पवित्रा गौडासोबतची एक रील व्हायरल झाली.

दर्शन हा कन्नड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता थुगुदीपा श्रीनिवारस यांचा मुलगा आहे. दर्शनने १९७७  मध्ये 'महाभारत' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याआधी ते प्रोजेक्शनिस्ट होते. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आणि त्यानंतर त्यांनी मुख्य नायक म्हणून काम केले. मॅजेस्टिक या चित्रपटातून दर्शनला इंडस्ट्रीत ओळख मिळाली. 

दर्शनने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. यामध्ये नम्मा प्रितिया रामू, कलासिपल्य, गजा, करिया, नवग्रह, सारथी, बुलबुल या चित्रपटांचा समावेश आहे. त्याला क्रांतिवीर सांगोली रायण्णा या चित्रपटासाठी कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. 

हेही वाचा