किनाऱ्यावरून कारकडे जाताना कोसळलेल्या विजेच्या धक्क्यामुळे पर्यटक ठार; मिरामार येथील घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th May, 12:58 pm
किनाऱ्यावरून कारकडे जाताना कोसळलेल्या विजेच्या धक्क्यामुळे पर्यटक ठार; मिरामार येथील घटना

पणजी : गेल्या आठवड्याभरात राज्यात विविध ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात गारवा पसरलेला आहे. सायंकाळी अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त जनतेला हायसे वाट आहे. विजेचा गडगडाट अधूनमधून आपली झलक दाखवत असतोच. अशाच प्रसंगी, पणजीतील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर एक धक्कादायक घटना घडली. केरळमधील एर्नाकुलममधील एका पर्यटकाचा कोसळलेल्या विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला.5 die, 12 injured in thunderbolt strikes in Uttar Pradesh's Ballia - India  Today

अखिल विजयन असे ३५ वर्षीय मृताचे नाव असून तो आपल्या कुटुंबीय व मित्रांसह समुद्रकिनाऱ्यावर आला होता. मंगळवारी रात्री ८:३० दरम्यान वीजांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसात भिजत आपल्या कारकडे जात असताना,अखिल विजयन यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. यात त्यांची पत्नी आणि इतर एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. File:Miramar beach goa.JPG - Wikipedia

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरसत असलेल्या पावसापासून स्वतचा बचाव करण्यासाठी विजयन आणि त्यांच्यासोबत असलेला  ७-८ जणांचा गट आपल्या गाडीकडे जात असताना विजयन अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना सांभाळण्यासाठी पुढे सरसावलेल्यांना निपचित पडलेल्या विजयन यांच्याकडून कोणतीही हालचाल आढळून आली नाही. तातडीने १०८ रुग्णवाहिकेस पाचारण करत त्यांना गोमेकॉत नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विजेचा जबरदस्त लोण त्यांच्या अंगातून जमिनीत गेल्याने त्यांना मृत्यू आल्याचे पोलिसांनी सांगितले. Miramar Beach Goa Tickets, timings, offers May 2024 | ExploreBees

दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय खराब असे हावामान असतांना एक गट आपल्या गाडीकडे जात होता. यावेळी विजेचा एक जबरदस्त लोण त्या परिसरात उतरला. त्याचा प्रभाव तत्काळ विजयन, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मित्रावर झाला. यात विजयन यांना धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान विजयन यांच्या पत्नी आणि मित्र शुद्धीवर आल्या मात्र विजयन तेथेच निपचित पडून होते. Lightning, hail, floods lash France, leaving one dead, damage - Science  News | The Financial Express

पोलिसांनी शवविच्छेदन करून  'प्रचंड ताकदीचा विद्युत झटका आणि त्याच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या जखमा या विजयन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्व सोपस्कर पार पाडत मृतदेह विजयन यांच्या परिवाराकडे सुपूर्द केला.