मृत घोषित केलेला बेपत्ता जर्मन-अमेरिकन अब्जाधीश सापडला रशियात!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th April, 04:19 pm
मृत घोषित केलेला बेपत्ता जर्मन-अमेरिकन अब्जाधीश सापडला रशियात!

मास्को : तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असलेले जर्मन-अमेरिकन अब्जाधीश कार्ल-एरिव्हान हौब हे चार वर्षांपासून बेपत्ता होते. ते रशियामध्ये सापडले आहेत. हौब यांना एप्रिल २०१८ मध्ये स्वित्झर्लंडमधील झर्मेट येथे शेवटचे पाहिले गेले होते. हौब त्यावेळी तिथे सुटी घालवण्यासाठी आले होते.

हौब बेपत्ता झाल्यानंतर स्विस आणि जर्मन सरकारने त्यांना शोधण्याची मोहीम सुरू केली होती. हौब यांचा शोध घेण्यासाठी ५ हेलिकॉप्टरने ६ दिवस शोध मोहीम राबवली. कार्ल-एरिव्हन हौब हे ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

सर्वत्र शोध घेऊनही हौब सापडले नाहीत, तेव्हा २०२१ मध्ये जर्मन न्यायालयाने त्यांना कायदेशीररित्या मृत घोषित केले होते. हौब हे रिटेल क्षेत्रातील दिग्गज टेन्झेलमन ग्रुपचे मालक होते, ज्याचे जगभरात ७५ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही कंपनी त्यांचा भाऊ ख्रिश्चन चालवत आहे.

हौब यांना दोन मुले आहेत. ज्या दिवशी हौब बेपत्ता झाले, त्या दिवशी त्यांनी त्यांच्या मित्र एर्मिलोव्हाला १३ वेळा कॉल केला आणि एक तास बोलले. त्यामुळे दोन्ही देशांच्या संयुक्त तपास यंत्रणेला त्याच्यावर संशय आला. यानंतर, एजन्सीने मॉस्कोमध्ये तपास केला आणि समजले की हौब तिच्या मित्रासह तेथे राहतो.

तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की २००८ मध्ये हौब आणि एर्मिलोव्हा यांनी मॉस्कोमध्ये एकत्र कट रचला होता. यानंतर हौब वारंवार रशियाला भेट देत राहिले. एरमिलोवा रशियाच्या सुरक्षा एजन्सी एफएसबीमध्ये काम करते. सध्या हौब रशियात आहेत.

हेही वाचा