जगभरात पसरलेले गोल्डी ब्रारच्या हत्येचे वृत्त खोटे... अमेरिकी पोलिसांचा खुलासा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 11:43 am
जगभरात पसरलेले गोल्डी ब्रारच्या हत्येचे वृत्त खोटे... अमेरिकी पोलिसांचा खुलासा

न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो पोलीस विभागाने बुधवारी कॅनडा-स्थित गुंड गोल्डी ब्रार याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्याचा झाल्याचे वृत्त जगभरात पसरल्यानंतर अमेरिकेच्या पोलीस यंत्रणेवरही दबाव आला आहे. जगभरात सोशल मीडियावर पसरलेले वृत्त नाहक खोटे असल्याचा खुलास येथील पोलिसांनी केला आहे. एका घटनेत दोघांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. मात्र, त्यात ब्रार याचा समावेश नव्हता. याची शहानिशा करण्यात आली आहे, असे लेफ्टनंट विल्यम जे. यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रारच्या हत्येची बातमी जगभरात पसरल्यानंतर आम्ही पुष्टी केली. त्यानंतर ते वृत्त पूर्णपणे सत्य नसल्याचे आढळून आले. जर तुम्ही ऑनलाइन चॅटमुळे शूटिंगचा बळी ‘गोल्डी ब्रार’ असल्याचा दावा करत असाल, तर हे पूर्णपणे खरे नाही. सोशल मीडिया आणि ऑनलाइन न्यूज एजन्सींवरून चुकीची माहिती पसरवल्यामुळे आम्हाला आज सकाळी जगभरातून चौकशीसाठी फोन आले. ही अफवा कोणी सुरू केली याचा शोध सुरू आहे. हे वृत्त वणव्यासारखे पसरले. यात काहीही तथ्य नाही, असे लेफ्टनंट विल्यम जे. यांनी म्हटले आहे.

कॅलिफोर्नियातील फेअरमॉन्ट हॉटेलच्या बाहेर दोघांवर विरुद्ध टोळीने गोळीबार केला होता. त्यात साधारण ३० वर्षांच्या व्यक्तीच्या शरीरात वरच्या भागात गोळ्या लागल्या होत्या. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या खालच्या भागाला दुखापत झाली आणि त्याच्यावर उपचार करून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. पोलिसांना अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. पण, मृत व्यक्ती ब्रार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा