कच्च्या मालाचे भाव कमी झालेत; तरी तुमच्या खिशावर पडणारा खर्चाचा बोजा का बरे कमी झाला नसावा ?

गेल्या काही महिन्यांत दैनंदिन वस्तूंच्या किमतीत काही बदल झाल्याचे तुमच्या लक्षात आले आहे का? या उद्योगात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या आहेत. पण बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किरकोळ किमती एकतर स्थिर आहेत किंवा वाढल्या आहेत. काय असावे यामागील कारण ? वाचा हा अहवाल...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 03:52 pm
कच्च्या मालाचे भाव कमी झालेत; तरी तुमच्या खिशावर पडणारा खर्चाचा बोजा का बरे कमी झाला नसावा ?

नवी दिल्ली : एफएमसीजी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश कच्च्या मालाच्या किमती एकतर स्थिर आहेत किंवा कमी झाल्या आहेत. असे असतानाही आपल्याला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत कोणताही दिलासा मिळत नाही. एका अहवालात असे म्हटले आहे की अशा वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्यांचा नफा कायम ठेवण्यासाठी किरकोळ वस्तूंच्या किमती कमी केल्या नाहीत. नजीकच्या काळात या कंपन्या किमती वाढवण्याचीही शक्यता आहे.FMCG index down over 5% in 2024 YTD; will this negative trend continue? |  Mint

इनपुट खर्चात कपात

बहुतेक ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी गेल्या काही तिमाहीत होम, पर्सनल आणि इतर  श्रेणीशी संबंधित उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. असे असतानाही ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत अधिक आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत किमती वाढवण्यात आल्याचे ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांचे म्हणणे आहे. महागाईची सुरुवात कोरोना महामारीपासून झाली आणि रशियाच्या युक्रेनवर आक्रमणानंतर ती आणखी वाढली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कच्च्या तेल, पामतेल आणि कॉफीच्या किमती वर्षभरापूर्वीच्या तुलनेत वाढल्या आहेत. तर कोको, कॉफी आणि साखरेच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.Five Forces Analysis of Indian FMCG Industry - The Executive Saga

उत्पादनांच्या किमती सामान्य

दैनंदिनी  वापरात येणाऱ्या उत्पादनांच्या किमती आता सामान्य आहेत हे सत्य स्वीकारावे लागेल. काही कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी, अजूनही इनपुट खर्चावर दबाव तसा आहेच. इनपुट खर्चाचा विशेष प्रभाव हा विशेषतः फूड प्रोसेसिंग  विभागात दिसून येतो. अशा परिस्थितीत, उत्पादनांच्या किमती एकतर स्थिर राहतील किंवा काही प्रकरणांमध्ये वाढू शकतात, परंतु निदान येत्या ६ महिन्यांत किमतीत आणखी कपात होण्याची शक्यता नाही.What are Fast-Moving Consumer Goods (FMCG)?

काही वस्तूंचे भाव कमी झाले आहेत

गेल्या दोन वर्षांत डिटर्जंटच्या किमतीत १५ टक्के वाढ झाल्यानंतर, गेल्या तिमाहीत या श्रेणीत किमतीत कपात झाली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढू लागल्या आहेत. ग्रामीण भागात जलद गतीने विकल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या (FMCG) विक्रीतील वाढीने जवळपास तीन वर्षांत प्रथमच शहरी बाजाराला मागे टाकले आहे. मागणीत सुधारणा होण्याचे हे प्रारंभिक लक्षण असल्याचे बोलले जात आहे.FMCG companies cut prices of soaps, hair oils, detergents, and edible oils  | Companies News - News9live

ओरल केअर प्रोडक्टसच्या किंमतीत लक्षणीय वाढ

अहवालानुसार, सौंदर्य आणि पर्सनल केअरच्या काही श्रेणींमध्ये गेल्या दोन महिन्यांत किमतीत किरकोळ कपात झाली आहे, परंतु ओरल केअर प्रॉडक्टच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. डिटर्जंट आणि डिश वॉशच्या किमती गेल्या सहा महिन्यांत कमी झाल्या आहेत, परंतु दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत अजूनही ४-३० टक्के चढ्याच आहेत. खाद्यतेल वगळता अन्न आणि पेय उत्पादनांमध्ये गेल्या सहा महिन्यांत किमती जैसे थेच राहिल्या आहेत. उदाहरणार्थ, गेल्या सहा महिन्यांत साबणाच्या किमती बदललेल्या नाहीत. परंतु हे दोन वर्षांपूर्वीपेक्षा १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ओरल केअर  श्रेणीतील किमतीत दोन वर्षात सर्वाधिक वाढ झाली आहे, ज्यामुळे डिसेंबर तिमाहीत कोलगेट कंपनीचे EBITDA मार्जिन ३३.६ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.FMCG looks beyond 'temporary blip', keeps faith in GST, Retail News, ET  Retail

नजीकच्या भविष्यात किंमती आणखी वाढू शकतात

होम केअर प्रोडक्टस, फूड अँड बेव्हरेजेस यांच्या किमती गेल्या १० वर्षांत दुप्पट झाल्या आहेत, परंतु कोविडनंतर ही वाढ अधिक तीव्र झाली आहे. गेल्या वर्षभरात कच्च्या मालाच्या किमती घसरल्या आहेत, त्यामुळे कंपन्यांनी मार्जिन विस्ताराद्वारे नफा कायम ठेवल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. A spoiler alert for listed FMCGs | Mint

हेही वाचा