चोरट्यांनी फोंड्यातील साई बाबा मंदिरातील फंडपेटी फोडून पळवली रोकड

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 02:25 pm
चोरट्यांनी फोंड्यातील साई बाबा मंदिरातील फंडपेटी फोडून पळवली रोकड

फोंडा : दुर्भाट येथील श्री साई बाबा मंदिरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून देवळातील फंडपेटी अंदाजे १०० मीटर अंतरावर नेऊन फोडली. फंडपेटीतून अंदाजे ५० हजार रुपये चोरीस गेल्याचा संशय देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, मंदिरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना तपास करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

गुरुवारी रात्री आरत्या व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर ९.३० वाजता मंदिर बंद करण्यात आले होते. पण, शुक्रवारी सकाळी देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वनाथ नाईक मंदिरात दाखल झाल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी फंडपेटी लंपास केल्याचे उघड झाले. मंदिराजवळ तपासणी केली असता अंदाजे १०० मीटर अंतरावर जंगल भागात फंडपेटी आढळून आली. मात्र, फंडपेटीतील रक्कम गायब होती. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना तपास करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

हेही वाचा