लोकसभेचे तिकीट नाकारल्याने MDMK खासदाराने केली आत्महत्या!

MDMK चे खासदार ए. गणेशमूर्ती यांचा विषप्राशनामुळे मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th March, 11:36 am
लोकसभेचे तिकीट नाकारल्याने MDMK खासदाराने केली आत्महत्या!

चेन्नई : तामिळनाडूतील इरोड येथील MDMK चे विद्यमान खासदार ए. गणेशमूर्ती (७६) यांनी पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्याने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी रविवार, २४ रोजी विषप्राशन केले होते. कुटुंबीयांना ही बाब समजल्यानंतर त्यांना लगेच कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र, ते निष्फळ ठरले.

गणेशमूर्ती यांच्या जागी MDMK आघाडीने इरोडमधून युवा नेते के. ई. प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश हे तामिळनाडूचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या जवळचे मानले जातात. तिकीट वाटपाबाबत MDMK चे संस्थापक वायको यांनी गणेशमूर्तींना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, असे गणेशमूर्तींच्या निकटवर्तीयांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा