आधी मारले; नंतर मागितली नाना पाटेकरांनी माफी : पहा व्हिडिओ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
16th November, 08:30 pm
आधी मारले; नंतर मागितली नाना पाटेकरांनी माफी : पहा व्हिडिओ

नाना पाटेकर सध्या वाराणसीमध्ये त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'जर्नी'च्या शूटिंगदरम्यान एका चाहत्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि नाना पाटेकरांनी त्याला कानाखाली मारली. आता त्यांनी या घटनेवर मौन तोडत स्पष्टीकरण दिले आहे.

नाना पाटेकर म्हणाले की, ही संपूर्ण घटना त्यांच्या जर्नी चित्रपटातील एका दृश्याचा भाग आहे जिथे त्या व्यक्तीने त्यांना विचारले, 'अरे म्हाताऱ्या, तुला टोपी विकायची आहे का?' तो बोलतो आणि मग नाना, टोपी घातलेला, त्याला मारतो आणि पळवून लावतो.

नाना पाटेकर यांनी दिले स्पष्टीकरण

नानांनी सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याच दृश्याची रिहर्सल सुरू होती आणि तेवढ्यात एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आला. नानांनी त्याला दृष्याचा भाग आहे असे वाटले त्यामुळे त्यांनी त्याला मारले आणि तेथून हाकलून दिले, परंतु नंतर कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून शेअर केला आणि व्हायरल केला.

आपली चूक लक्षात येताच त्यांनी आणि शूटिंग क्रूने त्या व्यक्तीचा शोध सुरू केला पण तोपर्यंत तो मुलगा तिथून निघून गेला होता, असे नानांनी स्पष्ट केले.

नाना पाटेकर यांनी माफी मागितली

आपल्या नकळत झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो, असे नाना पाटेकर म्हणाले. जर त्यांना ती व्यक्ती सापडली तर ते त्याची माफी मागायलाही तयार आहेत, असे ते म्हणाले. बनारसच्या घाटावर गर्दी असूनही शूटिंगदरम्यान त्यांना अनेक लोकांकडून भरपूर पाठिंबा मिळत असून स्थानिक लोकांकडून त्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे नाना म्हणाले.