साळ पंचायतीत लोकांशी संवाद
डिचोली : ‘प्रशासन तुमच्या दारी’ अंतर्गत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी साळ पंचायत विभागातील ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या, सूचना समजून घेतल्या. यावेळी सरकारी अधिकारी, सरपंच, पंच सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
सरकारच्या माध्यमातून विविध योजना घरोघरी पोहोचवणे, नागरिकांना मूलभूत, पायाभूत सुविधा देणे, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, वाहतूक याबरोबरच विविध प्रकल्प व इतर बाबतीत जनतेला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. सर्वांनी विकासाच्या प्रक्रियेत साथ द्यावी, असे आवाहन डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.
यावेळी ग्रामस्थांनी पाणी, वीज, विविध योजना, नोकऱ्या आदींबाबत आपले प्रश्न उपस्थित केले. स्वयंपूर्ण मित्रांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर गोवाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. शेट्ये यांनी केले.