भाजपासोबत जाणार नाहीच : नितीश

|
31st January 2023, 12:10 Hrs
भाजपासोबत जाणार नाहीच : नितीश

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युतीबाबतच्या सर्व शक्यता सोमवारी फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, आम्ही भाजपासोबत हात मिळवण्याऐवजी मरण पत्करू. २०१७ मध्ये आम्ही एनडीएत गेलो ही आमची मोठी चूक होती. कुमार यांचा जनता दल (युनायटेड) आणि भाजपाने २०१७ मध्ये युती केली होती. ही युती पुढे टिकली नाही. यापुढे देखील उभय पक्षांमध्ये युती होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं कुमार यांनी आज स्पष्ट केले.

जनता दलाच्या (युनायटेड) नेत्यांनी भाजपाला आठवण करून दिली की, दोन पक्षांची युती होती तेव्हा भाजपाला मुस्लीम मतदारांसह जनता दलाचे सर्व समर्थक मतदान करायचे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे जे लोक भाजपासोबत नव्हते त्यांची मते जनता दलामुळे भाजपाला मिळत होती, असे ते म्हणाले.