गोव्यातील ‘पर्पल फेस्ट’चे पंतप्रधानांकडून कौतुक

‘मन की बात’मधून साधला संवाद : पद्म विजेत्यांच्या जीवनकथा वाचा


30th January 2023, 12:28 am
गोव्यातील ‘पर्पल फेस्ट’चे पंतप्रधानांकडून कौतुक

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : समुद्र किनाऱ्यासाठी ओळखले जाणारे टुरिस्ट हब गोवा पणजीत आयोजित ‘पर्पल फेस्ट’मुळे चर्चेत आहे. मला खात्री आहे की, अशा मोहिमा आपल्या सुलभ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. ‘पर्पल फेस्ट’ यशस्वी करण्यात ज्यांनी भाग घेतला, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या ९७ व्या भागातून रविवारी ते देेशवासीयांशी संवाद साधत होते.

पंतप्रधानांनी पद्म पुरस्कार विजेत्यांच्या जीवनकथा सांगितल्या आणि लोकांना त्यांच्या प्रेरणादायी जीवनकथा वाचण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मोठ्या संख्येने पद्म पुरस्कार विजेते आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित आहेत. टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा यांसारख्या आदिवासी भाषांवर केलेल्या कामासाठी अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सिद्दी, जारवा आणि ओंगे आदिवासींसोबत काम करणाऱ्यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आले आहेत.पंतप्रधान म्हणाले की, मला आनंद वाटतो की देशाच्या कानाकोपऱ्यात, जिथे जी-२० शिखर परिषद होत आहे, तिथे बाजरीपासून बनवलेल्या पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थांचा समावेश केला जात आहे. मी देशवासीयांचे अभिनंदन करतो.

लोगो, जिंगल बनवण्याची स्पर्धा

‘मन की बात’ कार्यक्रमाचा एप्रिलमध्ये १००वा भाग असेल. १००व्या भागासाठी केंद्र सरकारने लोगो आणि जिंगल बनवण्याची स्पर्धा ठेवली आहे. तुमचा तयार केलेला लोगो आणि जिंगल सबमिट करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी mygov.in या वेबसाईटवर अर्ज करू शकता.

हेही वाचा