गोवा विधानसभा निवडणूक २०२२ निकाल


10th March 2022, 08:36 am
दुपारी ०२.०२ वा. 

❝  फोंड्यातून भाजप उमेदवार रवी​ नाईक १३ मतांनी विजयी. मगोचे उमेदवार केतन भाटीकर यांना केवळ १ मत अधिक मिळाल्याने रवींनी मागितली होती फेरमतमोजणी. 


दुपारी ०१.५३ वा. 

❝  
आतापर्यंतचे विजयी उमेदवार
साखळी : डॉ. प्रमोद सावंत (भाजप)
मडगाव : दिगंबर कामत (काँग्रेस)
मडकई : सुदिन ढवळीकर (मगो)
कळंगुट : मायकल लोबो (काँग्रेस)
डिचोली : डॉ. चंद्रकांत शेट्ये (अपक्ष)
बाणावली : व्हेन्झी व्हिएगश (आप)
काणकोण : रमेश तवडकर (भाजप)
कुठ्ठाळी : आंतोन वाझ (अपक्ष)
 


दुपारी ०१.४९ वा. 

❝  
आतापर्यंतचे विजयी उमेदवार
पणजी : बाबूश मोन्सेरात (भाजप)
ताळगाव : जेनिफर मोन्सेरात (भाजप)
सांताक्रूज : रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस)
मांद्रे : जीत आरोलकर (मगो)
पेडणे : प्रवीण आर्लेकर (भाजप)
फोंडा : केतन भाटीकर (मगो)
प्रियोळ : गोविंद गावडे (भाजप)

दुपारी ०१.१७ वा. 

❝  सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितली :  डॉ. प्रमोद सावंत. 


दुपारी ०१.४० वा. 

❝  
आतापर्यंतचे विजयी उमेदवार
पर्ये : दिव्या राणे (भाजप)
वाळपई : विश्वजीत राणे (भाजप)
कुडचडे : नीलेश काब्राल (भाजप)
केपे : एल्टॉन डिकॉस्ता (काँग्रेस)
साळगाव : केदार नाईक (काँग्रेस)
 


दुपारी ०१.३८ वा. 

❝  
• आतापर्यंतचे विजयी उमेदवार
कुंकळ्ळी  : युरी आलेमाव (काँग्रेस)
कुडतरी : आलेक्स रेजिनाल्ड (अपक्ष)
दाबोळी : मॉविन गुदिन्हो (भाजप)
फातोर्डा : विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)
मये : प्रेमेंद्र शेट (भाजप)
नुवे : आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस)
मुरगाव : संकल्प आमोणकर (काँग्रेस)
 


दुपारी ०१.१७ वा. 

❝  सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितली :  डॉ. प्रमोद सावंत.


दुपारी ०१.०८ वा. 

❝  डिचोलीचे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा भाजपला पाठिंबा. निकाल जाहीर होताच आम्ही आजच राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.


दुपारी १२.१७ वा. 

❝  प्रियोळमध्ये गोविंद गावडे पिछाडीवरून आघाडीवर. ३३ मतांची आघाडी. सांतआंद्रेत रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे विरेश बोरकर, डिचोलीत अपक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, तर हळदोण्यात काँग्रेसचे कार्लुस फेरेरा यांचे विजय निश्चित. साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ४४८ मतांची आघाडी.

दुपारी १२.०६ वा. 

❝  मोन्सेरात, राणे दाम्पत्याचे विजय निश्चित.  पणजीतून बाबूश मोन्सेरात,  ताळगावातून जेनिफर मोन्सेरात तसेच वाळपईतून विश्वजीत राणे व पर्येतून दिव्या राणे यांचे विजय जवळपास निश्चित 

सकाळी ११.४६ वा. 

❝  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ५८५ मतांची आघाडी.  हळदोण्यात काँग्रेसचे कार्लुस फेरेरा १२८,  बाणावलीत आपचे व्हेन्झी व्हिएगस ७००,  डिचोलीत अपक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये ५१२,  कुठ्ठाळीत अपक्ष आंतोन वाझ १९०,  कुंभारजुवेत काँग्रेसचे राजेश फळदेसाई २७८ मतांनी पुढे 

सकाळी ११.३७ वा. 

❝ साखळी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आघाडी ७१८३ मतांसह कायम.  धर्मेश सगलानी ६५९८ मते 

सकाळी ११.३५ वा. 

❝ 
आतापर्यंतच्या मतमोजणीनंतर विजय निश्चित असलेले उमेदवार
रूडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस)
नीळकंठ हळर्णकर (भाजप)
विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)
प्रेमेंद्र शेट( भाजप)
सुदिन ढवळीकर (मगो)
दिगंबर कामत (काँग्रेस)
आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस)
संकल्प आमोणकर (काँग्रेस)
रोहन खंवटे (भाजप)
दिव्या राणे (भाजप)
विश्वजीत राणे (भाजप)
एल्टॉन डिकॉस्टा (काँग्रेस)
प्रवीण आर्लेकर (भाजप)
मायकल लोबो ((काँग्रेस)
युरी आलेमाव (काँग्रेस)
रमेश तवडकर (भाजप)
गणेश गावकर (भाजप)
सुभाष शिरोडकर (भाजप)
 


सकाळी ११.२९ वा. 

❝ साळगाव : केदार नाईक १३२ मतांनी आघाडीवर 

सकाळी ११.२७ वा. 

❝ साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ३६६ मतांनी आघाडीवर.  डिचोलीत अपक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये,  साळगावात काँग्रेसचे केदार नाईक,  सांगेत भाजपचे सुभाष फळदेसाई,  वास्कोत भाजपचे दाजी साळकर,  तर वेळ्ळीत आपचे क्रूज सिल्वा पुढे 

सकाळी ११.१६ वा. 

❝ मडगावात दिगंबर कामतांचा विजय नक्की.  पाचव्या फेरीनंतर ११६०८ मते.  आजगावकर यांना ४९३० मते.  कामत यांना ६६७८ मतांची आघाडी.  आणखी एक फेरी बाकी 

सकाळी ११.१३ वा. 

❝ सांतआंद्रेत रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे विरेश बोरकर ६७ मतांनी आघाडीवर.  ताळगावात मंत्री जेनिफर मोन्सेरात ६८९,  तर शिवोलीत भाजपचे दयानंद मांद्रेकर २०० मतांनी पुढे 

सकाळी ११.११ वा. 

❝ कुडतरीत दुसर्‍या फेरीअखेर रेजिनाल्ड २३८६,  आरजीच्या रुबर्ट परेरांना १३३५,  डॉम्निक गावकर १०९२ तर काँग्रेसच्या मरिनो रिबेलोंना ९९२ मते 

सकाळी ११.०४ वा. 

❝ साखळी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ५६१२ मतांसह आघाडीवर. धर्मेश सगलानी ५२४६ मते 

सकाळी ११.०१ वा. 


मतांमध्ये पिछेहाट होत असल्याचे दिसताच बाबू कवळेकर मतमोजणी ठिकाणावरून निघून गेले

सकाळी १०.५४ वा. 

❝  केपे तिसर्‍या फेरीनंतर एल्टन डिकॉस्टा ६९०० तर बाबू कवळेकर ४१०० 

❝ काणकोण तिसर्‍या फेरीनंतर रमेश तवडकर ३२६६ तर जनार्दन भंडारी २२९६ 

सकाळी १०.४६ वा. 

आघाडीवर 
फोंडा : केतन भाटीकर  
शिरोडा : सुभाष शिरोडकर
मडकई : सुदिन ढवळीकर
मुरगाव : संकल्प आमोणकर 
वास्को : दाजी साळकर
दाबोळी : मॉविन गुदिन्हो
कुठ्ठाळी : अंतानिओ वाझ
नुवे : आलेक्स सिक्वेरा
कुडतरी : आलेक्स रेजिनाल्ड
फातोर्डा : विजय सरदेसाई
मडगाव : दिगंबर कामत
बाणावली : व्हेंझी व्हिएगास
नावेली : आवेर्तान फुर्तादो
कुंकळ्ळी : युरी आलेमाव
वेळ्ळी : साविओ डिसिल्वा
केपे : एल्टन डिकॉस्टा
कुडचडे : नीलेश काब्राल
सावर्डे : गणेश गावकर
सांगे : सावित्री कवळेकर
काणकोण : रमेश तवडकर
 

सकाळी १०.४१ वा. 

❝ पणजी : चौथी फेरी : बाबूश ४३९७ मतांसह आघाडीवर, उत्पल पर्रीकर ३६९३ मते 

सकाळी १०.३८ वा. 

❝ दुसऱ्या फेरीनंतर साखळीत धर्मेश सगलानी ४१७ मतांनी आघाडीवर.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुन्हा पिछाडीवर.  केपेत काँग्रेसच्या एल्टॉन डिकॉस्ता यांची तब्बल २,४२४ मतांची आघाडी.  उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मागे 

सकाळी १०.३७ वा. 

❝ कुडतरीतून अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड आघाडीवर. आप दुसर्‍या तर काँग्रेस तिसर्‍या स्थानी 

सकाळी १०.३४ वा. 

❝ मांद्रे : चौथी फेरी : जित आरोलकर ४०६६ मते, दयानंद सोपटे ३४२० मते, लक्ष्मीकांत पार्सेकर २७३९ मते 

सकाळी १०.१८ वा. 

❝ भाजप १७,  काँग्रेस १३,  गोवा फॉरवर्ड व आप १,  मगो ५,  अपक्ष दोन जागांवर पुढे 


सकाळी १०.१४ वा. 

❝ बाणावलीत टोनी डायस,  कुंकळ्ळीत युरी आलेमाव,  फातोर्ड्यात विजय सरदेसाई,  मडगावात दिगंबर कामत,  नावेलीत आवेर्तान फुर्तादो,  नुवेमध्ये आलेक्स सिक्वेरा,  वेळ्ळीत सावियो डिसिल्वा आघाडीवर 


सकाळी १०.११ वा. 

❝ हळदोणा : ग्लेन टिकलो आघाडीवर. २८४५ मते. कार्लोस फेरेरा २८०२ मते 


सकाळी १०.०९ वा. 

❝ पणजी : तिसऱ्या फेरीअंती बाबूश मोन्सेरात आघाडी २९८१ मते, उत्पल पर्रीकर २६४७ मते, एल्विस गोम्स १५४५ मते 


सकाळी १०.०४ वा. 

❝ साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ४४६ मतांनी पिछाडीवर.  कुडतरीत अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड पिछाडीवर.  कुंकळ्ळीत काँग्रेसचे युरी आलेमाव,  वेळ्ळीत काँग्रेसचे सावियो डिसिल्वा,  काणकोणात काँग्रेसचे जनार्दन भंडारी,  सांगेत अपक्ष सावित्री कवळेकर,  कुठ्ठाळीत अपक्ष आंतोन वाझ पुढे 


(छाया : नारायण पिसुर्लेकर)

सकाळी ९.५३ वा. 
❝ साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची १४० मतांची आघाडी.  हळदोण्यात काँग्रेसचे कार्लुस फेरेरा ८३,  साळगावात जयेश साळगावकर ११० मतांनी पुढे.  कळंगुटमध्ये मायकल लोबो,  म्हापशात जोशुआ डिसोझा,  मयेत प्रेमेंद्र शेट,  सांतआंद्रेत फ्रान्सिस सिल्वेरा,  सांताक्रूजमध्ये टोनी फर्नांडिस पुढे सकाळी ९.४५ वा. 
❝ कुंभारजुवेत काँग्रेसचे राजेश फळदेसाई १२ मतांनी आघाडीवर.  शिवोलीत काँग्रेसच्या डिलायला लोबो,  थिवीत भाजपचे निळकंठ हळर्णकर,  पेडणेत मगोचे राजन कोरगावकर १५ मतांनी,  तर केपेत काँग्रेसचे एल्टॉन डिकॉस्ता पुढे सकाळी ९.३८ वा. 
❝ थिवीतून नीळकंठ हळर्णकर आघाडीवर सकाळी ९.३५ वा. 
❝ मांद्रेत जीत आरोलकर १४० मतांनी आघाडीवर.  पर्वरीत रोहन खंवटे १,१२३, मयेत प्रेमेंद्र शेट ५०३,  तर डिचोलीत नरेश सावळ १४६ मतांनी पुढे सकाळी ९.२८ वा. 
❝ मांद्रे मतदारसंघातून जीत आरोलकर आघाडीवर 

सकाळी ९.१७ वा. 
❝ जेनिफर मोन्सेरात यांना ताळगाव मतदार संघात ८८ मतांची आघाडी सकाळी ९.१३ वा. 
❝ साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ४३६ मतांनी पिछाडीवर.  काँग्रेसचे धर्मेश सगलानी पुढे.  डिचोलीत नरेश सावळ व डॉ.  चंद्रकांत शेट्ये यांच्यात चढाओढ.  हळदोण्यात भाजपचे ग्लेन टिकलो पुढे सकाळी ९.१२ वा. 
पहिल्या फेरी अखेर साखळीत काँग्रेसला ४३६ मतांची आघाडी सकाळी ९.०९ वा. 
❝ मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळीत ४३६ मतांनी पिछाडीवर ❞ सकाळी ९.०६ वा. 
❝ पर्येत दिव्या राणे,  वाळपईत विश्वजीत राणे,  फातोर्ड्यात विजय सरदेसाई,  पणजीत बाबूश मोन्सेरात,  शिवोलीत दयानंद मांद्रेकर,  म्हापशात जोशुआ डिसोझा पुढे सकाळी ९.०४ वा. 
पणजीतून बाबूश मोन्सेरात यांची ३८३ मतांनी आघाडी सकाळी ९.०३ वा. 
❝ म्हापशात जोशुआ डिसोझा १५० मतांनी आघाडीवर सकाळी ९.०१ वा. 
❝ विश्वजीत राणे वाळपई तर दिव्या राणेची पर्येत आघाडी सकाळी ८.५७ वा. 
❝ पेडणे,  डिचोलीत मगोला आघाडी,  फातोर्डात विजय सरदेसाई पुढे सकाळी ८.३८ वा. 
❝ पोस्टल मतदानात काँग्रेस २० जागांवर पुढे. भाजपची १६, मगो-तृणमूल युतीची ४ जागांवर आघाडी. ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीस सुरुवात. सकाळी ८.३५ वा. 
❝ पोस्टल मतदानात भाजप १६, काँग्रेस १७, मगो-तृणमूल ४ जागांवर पुढे सकाळी ८.३३ वा. 
❝ पोस्टल मतदानात भाजप १६, काँग्रेस १३, मगो-तृणमूल ४ जागांवर पुढे सकाळी ८.३१ वा. 
❝ पोस्टल मतदानात भाजप १५, काँग्रेस ९, मगो-तृणमूल २ जागांवर पुढे सकाळी ८.२७ वा. 
❝ पोस्टल मतदानात भाजप १०,  काँग्रेस ८,  मगो-तृणमूल २ जागांवर पुढे सकाळी ८.२७ वा. 
❝ पोस्टल मतदानात भाजप ९, काँग्रेस ६, मगो-तृणमूल २ जागांवर पुढे सकाळी ८.१८ वा. 
❝ पोस्टल मतदानात भाजप पुढे. भाजपची ८, काँग्रेसची ६ जागांवर आघाडी 


  • सकाळी ७.३० वा. 
❝ सर्व ४० मतदारसंघातील मतमोजणी एकाच वेळी होणार छाया : नारायण पिसुर्लेकर


मतमोजणीसाठी सज्जता

 गोवा ​विधानसभेचा निकाल लागण्यास आता अवघेच तास राहिले आहेत. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता पूर्ण सुरक्षा व्यवस्थेत ‘इव्हीएम’ असलेली स्ट्राँगरूम उघडली जाईल. त्यानंतर ८.०० पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल.