मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा काणकोणात सत्कार

भाजप मंडळातर्फे आयोजन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:51 pm

काणकोण : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा शुक्रवारी श्रीस्थळ पंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. या सत्काराचे आयोजन काणकोण भाजप मंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिकरी वेळीप यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाक्ष टेंग्से यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, नगराध्यक्षा नीतू देसाई, माजी आमदार विजय पै खोत, श्रीस्थळचे सरपंच गणेश गावकर, मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, राज्यकार्यकारिणी सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा उपाध्यक्ष महेश नार्इक व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे यावेळी डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्रीकर गेल्यानंतर गोव्यामधून भाजप संपेल असे बोलले जायचे. परंतु, कणखर बांद्याच्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता आपले काम सुरूच ठेवले व विकासकामांना प्राधान्य दिले. काणकोणवासीय त्यासाठी त्याचे ऋणी आहोत, असे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी सांगितले.
सत्कारमूर्तीची ओळख मनुजा नार्इक गावकर व विद्या गायक यांनी करून दिली. तर सुमन गावकर, प्रणाली प्रभुगावकर, मनुजा देसार्इ, चंदा देसार्इ यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. स्वागत नंदीप भगत यांनी केले. सूत्रसंचलन सुरज नार्इक गावकर यांनी केले. तर चंदा देसार्इ यांनी आभार मानले.
भाजपात केलेल्या कार्याची दखल घेण्यात येते. शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपची ओळख असून २२ वर्षेे काँग्रस पक्षात कार्य केले. परंतु, केलेल्या कार्याची कधीच प्रशंसा करण्यात आली नाही. आपली या पुढील कारकीर्द भाजपातच असेल. बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री