शेल्डे उपकेंद्रातील तीन वीज ट्रान्सफॉर्मर निकामी; कुशावतीसह द. गोव्याला फटका

अनेक भागांतील वीजपुरवठा सकाळपासून खंडित; शेल्डे येथील वीज उपकेंद्रातील तीन ट्रान्सफॉर्मर एकाच वेळी निकामी झाल्याने कुशावतीसह दक्षिण गोव्यातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
51 mins ago
शेल्डे उपकेंद्रातील तीन वीज ट्रान्सफॉर्मर निकामी; कुशावतीसह द. गोव्याला फटका

पणजी : दक्षिण गोवा जिल्हा (South Goa district) तसेच कुशावती जिल्ह्यातील (Kushavati District)  वीज पुरवठ्याला आज बुधवारी मोठा फटका बसला. त्यामुळे वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेल्डे येथील वीज उपकेंद्रातील (Xeldem Power substation)  तीन ट्रान्सफॉर्मर एकाच वेळी निकामी झाल्याने कुशावतीसह दक्षिण गोव्यातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

बुधवारी सकाळपासून अनेक भागांतील वीज गायब झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेल्डे वीज उपकेंद्रातील तीन ट्रान्सफॉर्मर एकाचवेळी बंद पडल्याने वीजपुरवठ्यावर व्यापक परिणाम झाला. या बिघाडामुळे कुशावती परिसरासह दक्षिण गोव्यातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सकाळपासून वीज नसल्याने घरगुती कामे, व्यावसाय, व्यवहार तसेच दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. अचानक उद्भवलेल्या या वीज संकटामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, अचानक तीन ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्यानंतर वीज खातेही आवश्यक उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी वीज खात्याचे अभियंते, कर्मचारी कार्यरत आहेत. लवकर आवश्यक उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी वीज ग्राहकांकडून होत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा