सलग सहा महिने रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार तात्पुरती बंद

केंद्र सरकारचा निर्णय; निष्क्र‌िय शिधापत्रिकांवर कारवाईचा बडगा : देशभरातील १.५८ कोटी रेशनकार्ड तात्पुरती बंद होणार; सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (PDS) सलग सहा महिने रेशनचा लाभ न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांवर आता कारवाई केली जाणार आहे. ऑक्टोबरपासून देशभरातील ‍अशा निष्क्रिय शिधापत्रिकांची तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू होणार आहे. याप्रक‌्रियेत देशभरातील १.५८ कोटी रेशनकार्ड तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
सलग सहा महिने रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार तात्पुरती बंद

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (PDS) सलग सहा महिने रेशनचा लाभ न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांवर आता कारवाई केली जाणार आहे. ऑक्टोबरपासून देशभरातील ‍अशा निष्क्रिय शिधापत्रिकांची तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू होणार आहे. याप्रक‌्रियेत देशभरातील १.५८ कोटी रेशनकार्ड तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.

रेशनचा नियमित लाभ न घेणाऱ्या कार्डधारकांची संख्या कमी करण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सलग सहा महिने रेशन न घेतलेल्या कार्डधारकांची नोंद तपासली जाणार असून, संबंधित शिधापत्रिकेबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाऊ शकतो.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रेशनचा लाभ न घेतलेल्या नागरिकांनी आपल्या शिधापत्रिकेची स्थिती तपासणे आणि आवश्यक असल्यास रेशन दुकानातून नियमित धान्य घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे निष्क्रिय कार्डांची छाननी होऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभ अधिक अचूकपणे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा
सर्व पहा