पणजी : चोडण फेरी धक्क्यावरील रॅम्प निसरडा झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या रॅम्पवरून ये-जा करताना प्रवासी तसेच दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
फेरी सेवेचा वापर करणाऱ्या नागरिकांना या रॅम्पवरून ये-जा करावी लागते. मात्र, रॅम्प निसरडा असल्याने घसरण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना तसेच वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे.
या ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रॅम्पवर घसरण रोखणारी व्यवस्था करणे, आवश्यक दुरुस्ती करणे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी योग्य उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे या फेरीतून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आडपई येथे धक्क्यावर फेरीत प्रवेश करताना फेरी पुढे गेल्याने एक टॅंकर घसरून पाण्यात गेला होता. सुदैवाने त्यावेळी ओहोटी असल्याने मोठी दुर्घटना टळली होती. चोडण फेरी धक्क्यावरील रॅम्प निसरडा बनल्याने सर्वच वाहनांना ते धोकादायक आहे. अवजड वाहनांना जास्त धोका असल्याचे या फेरीतून नियमित प्रवास करणा सांगितले. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून येत आहे.


