पणजी आझाद मैदान परिसरात जलवाहिनी फुटून पाणी वाया

फुटलेली जलवाहिनी दिसू नये म्हणून वर कार पार्किंग; कारवाई करण्याची मार‌ियाण फर्नांडिस यांची मागणी; यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला असताना गोव्यात जलवाहिन्या फुटून वाया जाणारे पाणी रोखावे अशी मागणी समाज कार्यकर्ते मारियाण फर्नांडिस यांनी केली आहे. पणजीतील आझाद मैदानावर जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. मात्र, जलवाहिनी दुरुस्त करून वाया जाणारे पाणी रोखण्याऐवजी फुटलेली जलवाहिनी दिसू नये म्हणून त्यावर कार पार्क करून ठेवल्याचेही त्यांनी दाखवून दिले.


2 hours ago
पणजी आझाद मैदान परिसरात जलवाहिनी फुटून पाणी वाया

पणजी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला असताना गोव्यात जलवाहिन्या फुटून वाया जाणारे पाणी रोखावे अशी मागणी समाज कार्यकर्ते मारियाण फर्नांडिस यांनी केली आहे. पणजीतील आझाद मैदानावर जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. मात्र, जलवाहिनी दुरुस्त करून वाया जाणारे पाणी रोखण्याऐवजी फुटलेली जलवाहिनी दिसू नये म्हणून त्यावर कार पार्क करून ठेवल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

एका बाजूला पाऊस कमी पडल्याने यापुढे होणारा संभाव्य पाणी टंचाईचा धोका तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या अनास्थेमुळे वाया जाणारे पाणी, ही परिस्थिती गंभीर असल्याचे मारियाण फर्नांडिस म्हणाले. भर शहरात फुटलेली जलवाहिनी व वाया जाणारे पाणी संबंधित शासकीय खात्यांना दिसत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. उद्या पाणी टंचाई निर्माण झाल्यास पैसेवाले राजकीय नेते, सरकारी अधिकारी ‘मिनरल वॉटर’ आणून आपली गरज भागवणार. मात्र, सर्वसामान्य गोमंतकीय काय करणार असा प्रश्न मारियाण फर्नांडिस यांनी उपस्थित केला. 

‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या नावाखाली पणजी शहराची वाट लावण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जलवाहिनी फुटून पाणी वाया जाणे हा त्याचाच परिणाम असल्याचा दावा मारियाण फर्नांडिस यांनी केला.

जलवाह‌िनी फुटून पाणी वाया जात आहे तर  दिसू नये म्हणून कार पार्क करून ठेवून दिशाभूल केली जात आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन जलस्त्रोत खाते, पेयजल खात्याचे मंत्री व वरीष्ठ अभियंत्यांनी याची गंभीर दखल घेऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी; अशी मागणी मारियाण फर्नांडिस यांनी केली.

हेही वाचा
सर्व पहा