केरी, सत्तरी येथील आजोबा देवस्थानात नवरात्रोत्सव साजरा करण्यावरून दोन गटांत वाद

केरी सत्तरी येथील आजोबा देवस्थानात नवरात्रोत्सव साजरा करण्यावरून वाद. देवकार्य करताना मामलेदरांनी निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा एका गटाचा आरोप. मामलेदार, पोलीस घटनास्थळी दाखल.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11th October, 01:04 pm
केरी, सत्तरी येथील आजोबा देवस्थानात नवरात्रोत्सव साजरा करण्यावरून दोन गटांत वाद

पणजी : केरी, सत्तरी येथील आजोबा देवस्थानात नवरात्रोत्सव साजरा करण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. देवकार्य पार पाडत असताना मामलेदारांनी निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा गंभीर आरोप एका गटाने केला आहे. या घडामोडींमुळे देवस्थान परिसर आणि परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मामलेदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही गटांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवस्थानातील धार्मिक विधी आणि नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबाबत यापूर्वीच काही नियम व अटी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, आजपासून सुरू झालेल्या प्रत्यक्ष उत्सवादरम्यान या नियमांचे पालन न झाल्याने वादाची परिस्थिती ओढवली. एका गटाने प्रशासनाकडे याबाबत धाव घेत आक्षेप नोंदवला, त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. सध्या गावात शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून, दोन्ही गटांमधील गैरसमज दूर करून मार्ग काढण्याचे काम सुरू आहे.


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा