बार्देशमध्ये एफडीएची कारवाई; सहा खाद्य आस्थापने बंद

बार्देश तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (Directorate of Food Drugs Administration, Goa FDA) विशेष तपासणी मोहीम राबवत रेस्टॉरंट्ससह चिकन कत्तल केंद्रे अशा एकूण ११ खाद्य आस्थापनांची तपासणी केली. यावेळी यापूर्वीच्या तपासणीत निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या सहा आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्रुटी दूर करीपर्यंत ही सहा आस्थापने बंद राहणार आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बार्देशमध्ये एफडीएची  कारवाई; सहा खाद्य आस्थापने बंद

म्हापसा: बार्देश तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (Directorate of Food Drugs Administration, Goa FDA) विशेष तपासणी मोहीम राबवत रेस्टॉरंट्ससह चिकन कत्तल केंद्रे अशा एकूण ११ खाद्य आस्थापनांची तपासणी केली. यावेळी यापूर्वीच्या तपासणीत निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या सहा आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्रुटी दूर करीपर्यंत ही सहा आस्थापने बंद राहणार आहेत.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनांना तातडीने व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश दिले. अन्न सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भातील आवश्यक नियमांचे पालन न झाल्याचे तपासणीत आढळून आले. यापूर्वीच्या पाहणीदरम्यान त्रुटी दूर करण्याच्या सूचना देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

संबंधित आस्थापनांमधील त्रुटी पूर्णपणे दूर करून आवश्यक नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तोपर्यंत ही आस्थापने बंदच राहणार आहेत. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एफडीएकडून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा
सर्व पहा