वॉशिंग्टन : अमेरिकेत (USA) मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारूण पराभव झाला. सिनेटमध्ये १०० पैकी ५२ जागा जिंकत डेमोक्रेटिक पक्षाने बहुमत मिळवले आहे.
रिपब्लिकन पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे प्रतिनिधीगृहात ४३५ पैकी ३२४ जागांचे निकाल हाती आले आहेत. इथेही डेमोक्रेटिक पक्षाची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. डेमोक्रेटिक पक्षाला २०२ जागा मिळाल्या आहेत. आणि बहुमतासाठी आणखी १६ जागांची गरज आहे. रिपब्लिकन पक्षाला १२३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
ख्रिस पप्पास यांचा सिनेटमध्ये विजय
अमेरिकेच्या राजकारणात उलथापालथ होत असताना आणखी एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या ख्रिस पप्पास यांनी सिनेटमध्ये विजय मिळवला आहे. या विजयासह अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रवेश करणारे ते पहिले समलैंगिक पुरूष ठरले आहेत. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे माजी सिनेटर जाॅन सुनुनू यांचा पराभव केला. त्यामुळे न्यू हॅम्पशायरमधील सिनेटची जागा डेमोक्रेटिक पक्षाकडे कायम राहिली आहे.


