अजून पोलिसांत तक्रार नाही

म्हापसा : कोलवाळ कारागृहात कैदी देवराज ह्यो याला एका कैद्याकडून मारहाण करण्यात आली. काल मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. मात्र बुधवारी सायंकाळी उशीरा पर्यंत कारागृह प्रशासनाकडून कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. हल्लीच राकेश पाटील या कैद्याला नारायण उर्फ बाबू भालेकर याने मारहाण करण्याची घटना घडली होती.
ही मारहाणीची घटना मंगळवारी २६ रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. देवराज याला सहकारी कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुरुंग कर्मचाऱ्यांनी जखमी कैद्याची संशयित कैद्याच्या तावडीतून सुटका केली. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.