२२ जून रोजी थेट मुलाखत

पणजी: गोव्यातील नामांकित कॉलेज 'व्ही. एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉ', मिरामार-पणजी येथे विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांसाठी आगामी २२ जून २०२६ रोजी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे.
| अ. क्र. | विषय (Subject) | एकूण पदे | कंत्राटी पदे आणि आरक्षण (Contract Basis) | तासिका तत्त्व पदे आणि आरक्षण (Lecture Basis) |
| १ | कायदा (LAW) | ०५ | ०३ पदे (ओबीसी - २, खुलावर्ग - १) | ०२ पदे (खुलावर्ग) |
| २ | अर्थशास्त्र | ०४ | -- | ०४ पदे (एसटी - २, खुलावर्ग - २) |
| ३ | इंग्रजी | ०४ | -- | ०४ पदे (खुलावर्ग - ३, एसटी - १) |
| ४ | राज्यशास्त्र | ०३ | ०१ पद (ओबीसी) | ०२ पदे (ओबीसी) |
| ५ | इतिहास | ०४ | -- | ०४ पदे (खुलावर्ग) |
| ६ | पर्यावरणशास्त्र (E.V.S) | ०२ | -- | ०२ पदे (खुलावर्ग) |
समुपदेशक : या पदासाठी उमेदवाराकडे मानसशास्त्र, मानवी विकास किंवा वेलनेस काउन्सिलिंगमध्ये किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. क्लिनिकल किंवा काउन्सिलिंग सायकॉलॉजीमधील नैपुण्य, एक वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुकांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले सविस्तर अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांसह कॉलेजमध्ये सादर करणे गरजेचे आहे.
पात्रता आणि अटी: प्राध्यापक पदांसाठी संबंधित विषयात किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि नेट किंवा सेच परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतनश्रेणी आणि सेवाशर्ती गोवा विद्यापीठ, उच्च शिक्षण संचालनालय (DHE) आणि पोर्वोरिमच्या सक्षम प्राधिकरणांच्या नियमांनुसार राहतील.
इच्छुक उमेदवारांनी २२ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता स्वतःच्या पूर्ण तपशिलासह (नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ.) अर्जाची प्रत आणि इयत्ता १० वी पासून पुढील सर्व गुणपत्रिका, १५ वर्षांचा गोव्यातील रहिवासी दाखला व कोकणी भाषेच्या ज्ञानाच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह मुलाखतीसाठी कॉलेजमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.