गोव्यातील दोन नामांकित महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक पदांसाठी भरती

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
10 hours ago
गोव्यातील दोन नामांकित महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक पदांसाठी भरती

पणजी : गोव्यातील शैक्षणिक क्षेत्रातील इच्छुकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील दोन नामांकित संस्थांनी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, हरमल आणि डायोसिसन सोसायटी ऑफ एज्युकेशनचे रोजरी वाणिज्य आणि कला महाविद्यालय नावेली, सासष्टी या दोन संस्थांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

१. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, हरमल

या महाविद्यालयात बी.ए.बी.एड., बी.एस्सी.बी.एड. Integrated Programme आणि इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (ITEP) अंतर्गत कंत्राटी आणि लेक्चरर पद्धतीवर अनेक जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये शिक्षणशास्त्र, भूगोल, मराठी, गणित, विज्ञान, कला, आयसीटी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी, कोकणी, हिंदी, इतिहास, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांच्या सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश आहे. याशिवाय मल्टिपल डिसिप्लिनरी समुपदेशक पदही भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ऑनलाईन (Google Form द्वारे) अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती महाविद्यालयाच्या www.gpcce.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


अ. क्र.पदाचे नाव आणि विषयकंत्राटी (Contractual)लेक्चरर (Lecture Basis)
बी.ए.बी.एड./बी.एस्सी.बी.एड. एकात्मिक कार्यक्रम
सहाय्यक प्राध्यापक – शिक्षणशास्त्र (शिक्षणाभिमुख दृष्टिकोन किंवा बुनियादी शिक्षण)०१ अनारक्षित
सहाय्यक प्राध्यापक – भूगोल अध्यापनशास्त्र०१ दिव्यांग PWD-(A)(a) 
सहाय्यक प्राध्यापक – मराठी अध्यापनशास्त्र०१ खुला वर्ग (UR)
सहाय्यक प्राध्यापक – गणित अध्यापनशास्त्र ०१ खुला वर्ग (UR)
सहाय्यक प्राध्यापक – विज्ञान अध्यापनशास्त्र०१ खुला वर्ग (UR)०१ खुला वर्ग (UR)
सहाय्यक प्राध्यापक – कला / परफॉर्मिंग आर्ट्स०१ खुला वर्ग (UR)
सहाय्यक प्राध्यापक – माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आय.सी.टी.)०१ दिव्यांग PWD-(A)(a) 
सहाय्यक प्राध्यापक – गणित०१ इतर मागासवर्गीय (OBC)
सहाय्यक प्राध्यापक – भौतिकशास्त्र०१ इतर मागासवर्गीय (OBC)
१०सहाय्यक प्राध्यापक – रसायनशास्त्र०१ खुला वर्ग (UR)०१ इतर मागासवर्गीय (OBC)
११सहाय्यक प्राध्यापक – इंग्लिश०२ इतर मागासवर्गीय (OBC), ०१ अनारक्षित
१२सहाय्यक प्राध्यापक – कोकणी०१ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)०१ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
१३सहाय्यक प्राध्यापक – मराठी०१ खुला वर्ग (UR)
१४सहाय्यक प्राध्यापक – हिंदी०१ अनुसूचित जमाती (ST)
१५सहाय्यक प्राध्यापक – भूगोल०१ खुला वर्ग (UR)
१६सहाय्यक प्राध्यापक – इतिहास०१ खुला वर्ग (UR)
इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (ITEP)
१७सहाय्यक प्राध्यापक – शिक्षणशास्त्र (शिक्षणाभिमुख दृष्टिकोन या बुनियादी शिक्षण)०१ खुला वर्ग (UR)
१८सहाय्यक प्राध्यापक – वनस्पतीशास्त्र०१ इतर मागासवर्गीय (OBC)
१९सहाय्यक प्राध्यापक – गणित०१ खुला वर्ग (UR)
२०सहाय्यक प्राध्यापक – प्राणीशास्त्र०१ इतर मागासवर्गीय (OBC)
२१सहाय्यक प्राध्यापक – भौतिकशास्त्र०१ खुला वर्ग (UR)
२२सहाय्यक प्राध्यापक – रसायनशास्त्र०१ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
२३सहाय्यक प्राध्यापक – इंग्लिश०१ खुला वर्ग (UR)
२४सहाय्यक प्राध्यापक – कोकणी०१ इतर मागासवर्गीय (OBC)
२५सहाय्यक प्राध्यापक – मराठी०१ खुला वर्ग (UR)
२६सहाय्यक प्राध्यापक – हिंदी०१ अनुसूचित जमाती (ST)
२७सहाय्यक प्राध्यापक – भूगोल०१ खुला वर्ग (UR)
२८सहाय्यक प्राध्यापक – इतिहास०१ अनुसूचित जमाती (ST)
इतर पदे
२९महाविद्यालयीन समुपदेशक (College Counselor)०१ खुला वर्ग (UR)

२. डायोसिसन सोसायटी ऑफ एज्युकेशनचे रोजरी वाणिज्य आणि कला महाविद्यालय नावेली, सासष्टी

भारतीय संविधानाच्या परिच्छेद ३०(१) अंतर्गत येणाऱ्या या अल्पसंख्याक संस्थेत 'एडेड प्रोग्राम' अंतर्गत कंत्राटी आणि लेक्चरर तत्वावर एकूण ११ प्रकारची पदे भरली जाणार आहेत. यात वाणिज्य, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, गणितशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, हिंदी, इतिहास, मानसशास्त्र, कोंकणी या विषयांचे सहाय्यक प्राध्यापक आणि २ सल्लागार (Counsellors) पदांचा समावेश आहे.


क्र.पद आणि विषयकंत्राटी आधारीत (Contractual)व्याख्यात्याचेर आधारीत (Lecture Basis)
सहाय्यक प्राध्यापक - वाणिज्य०२ 

०१ - पूर्ण शैक्षणिक वर्षाक (लीन आधारीत)


०१ - ऑड सेमिस्टर

सहाय्यक प्राध्यापक - इंग्लीश०३ 

०१ - पूर्ण शैक्षणिक वर्षाक


०१ - ऑड सेमिस्टर

सहाय्यक प्राध्यापक - अर्थशास्त्र०३ 

०१ - पूर्ण शैक्षणिक वर्षाक


०१ - ऑड सेमिस्टर

सहाय्यक प्राध्यापक - समाजशास्त्र०१ ०२ 
सहाय्यक प्राध्यापक - गणितशास्त्र०१ (रिक्त शैक्षणिक रजेर ०१.०८.२०२६ ते शैक्षणिक वर्स सोंपत मेरेन)
सहाय्यक प्राध्यापक - म्हायती तंत्रज्ञान०१ 
सहाय्यक प्राध्यापक - हिंदी०१ 
सहाय्यक प्राध्यापक - इतिहास०२
सहाय्यक प्राध्यापक - मानसशास्त्र०१ 

०१ - पूर्ण शैक्षणिक वर्षाक


०१ - पद बाळंटर रजेर २४.०८.२०२६ मेरेन


०१ - ऑड सेमिस्टर

१०सहाय्यक प्राध्यापक - कोंकणी०१ 

०२ - पूर्ण शैक्षणिक वर्षाक


०१ - ऑड सेमिस्टर (रिक्त पद शैक्षणिक रजेर ३०.११.२०२६ मेरेन)

११समुपदेशक (Counselor)०२ 

या पदांसाठी कोंकणी भाषेचे ज्ञान सक्तीचे असून, मराठी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 'प्राचार्य, रोजरी वाणिज्य आणि कला महाविद्यालय, नावेली,  सासष्टी-गोवा ४०३७०७' या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या www.rosarycollege.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, मुलाखतीचे कॉल लेटर केवळ ईमेलद्वारेच पाठवले जाईल, असे प्राचार्य प्रो. हॅलीक एम. बारेटो यांनी स्पष्ट केले आहे.