कार्मेल महिला महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
24th May, 11:14 am
कार्मेल महिला महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

नुवे-सासष्टी येथील नामांकित 'कार्मेल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमन' या अल्पसंख्याक संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एऩएएसी (NAAC) कडून 'ए' ग्रेड प्राप्त या महाविद्यालयातील रिक्त पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाविद्यालयाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार, अंडरग्रेज्युएट स्तरावर इंग्रजी, हिंदी, कोंकणी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, वाणिज्य अशा एकूण १४ विषयांसाठी 'असिस्टंट प्रोफेसर'ची पदे भरली जाणार आहेत. ही पदे कंत्राटी आणि तासिका (लेक्चरर)तत्त्वावर भरली जातील. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी पदांमध्ये कंत्राटी तत्त्वावर एक 'कौन्सिलर' आणि एक 'लॅबोरेटरी असिस्टंट' (पर्यायी पद) भरण्यात येणार आहे.

१. शिक्षक पदे (Teaching Posts)

क्र.पदाचे नावकंत्राटी पद्धत (Contract)लेक्चरर पद्धत (Lecture)
सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी)०१०१
सहाय्यक प्राध्यापक (हिंदी)०१०२
सहाय्यक प्राध्यापक (कोंकणी)०१०२
सहाय्यक प्राध्यापक (राज्यशास्त्र)०१ (उपविभाग)०१
सहाय्यक प्राध्यापक (अर्थशास्त्र)०१०१
सहाय्यक प्राध्यापक (इतिहास)०२
सहाय्यक प्राध्यापक (मानसशास्त्र)०२०१
सहाय्यक प्राध्यापक (रसायनशास्त्र)०१ (उपविभाग)०१
सहाय्यक प्राध्यापक (वनस्पतिशास्त्र)०१
१०सहाय्यक प्राध्यापक (प्राणिशास्त्र)०१ (उपविभाग)०१
११सहाय्यक प्राध्यापक (भौतिकशास्त्र)०२
१२सहाय्यक प्राध्यापक (गणित)०२०२
१३सहाय्यक प्राध्यापक (वाणिज्य)०१ (उपविभाग)०१
१४सहाय्यक प्राध्यापक (व्यवसाय कायदा)०१

२. शिक्षकेतर पदे (Non-Teaching Posts)

क्र.पदाचे नावपदांची संख्या
समुपदेशक (Counsellor)०१ कंत्राटी पद्धत
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)०१ कंत्राटी पद्धत

उमेदवाराकडे गोव्यातील १५ वर्षांच्या रहिवासी दाखला असणे अनिवार्य आहे. तसेच कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक असून, मराठीचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. शिक्षण पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसांच्या आत आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी १५ दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी आवश्यक कागदपत्रांसह कॉलेजच्या कार्यालयात जमा करायची आहे. सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी महाविद्यालयाच्या `https://carmelcollegegoa.org/recruitments` या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्या डॉ. अल्डिना ब्रागांझा यांनी केले आहे.