२० लाखांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी, आसगाव येथे कुंपणाची नासधूस

हणजूण पोलिसांनी नोंदवला गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
२० लाखांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी, आसगाव येथे कुंपणाची नासधूस

म्हापसा : गोव्यातील (Goa) आसगाव येथील एकाकडून २० लाखांची खंडणी मागितल्यानंतर खंडणी न दिल्याने;  मालमत्तेतील दगडी कुंपण पाडल्याने, हणजूण पोलिसांनी (Anjuna Police)  विक्रम (बेंडेवाडा, सांगे) व इतर काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

याप्रकरणी कुणाल लुल्ला यांनी हणजूण पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीनुसार. विक्रम याने फोन करून २० लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची व आसगाव येथील मालमत्तेतील दगडी कुंपण पाडण्याची धमकी दिली.

त्यानंतर दीपक, सादिक व इतर काहीजणांना पाठवून आसगाव येथील आपल्या मालमत्तेतील दगडी कुंपण जबरदस्तीने पाडले. त्यामुळे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी भारतीय न्याय संस्था २०२३ च्या कलम ३०८ (४), ३२४ (४), ३५१ (३) यासह ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर अधिक तपास करीत आहेत.