खोर्लीतील रवळनाथ देवस्थानच्या वादावरून मामलेदार कार्यायलात तणाव

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
21 mins ago
खोर्लीतील रवळनाथ देवस्थानच्या वादावरून मामलेदार कार्यायलात तणाव

पणजी : गोव्यातील (Goa) खोर्ली येथील रवळनाथ देवस्थानच्या (Ravalnath Temple)  वादावरून मामलेदार कार्यालयात तणाव (Tention) निर्माण झाला.

देवळात १५० वर्षे होऊन गेली कायद्यानुसार तेथे एकच जल्मी पुजा करतो. मात्र, सरकारने (Government)  निवडलेल्या तात्पुरत्या समितीला व जल्मी यांना न विचारता मामलेदाराने रातोरात तलाठ्याला सांगून नव हिंदू गटाला चावी दिली. देवस्थानात कुणालाच हक्क नाही हा मामलेदाराने काढलेला आदेश आम्हाला मान्य आहे. मात्र, मामलेदार आपलाच आदेश धुडकावून त्यांना चावी देतात. आणि त्या चावीने नव हिंदू गटाने जबरदस्तीने मंदिर उघडून जबरदस्तीने देवाची पुजा केली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

मामलेदाराने दोन दिवस आदी समितीला आणि जल्मी यांना न सांगता देवळाचे कुलुप मोडून चावी व कुलुप बदलले. आम्ही या विषयी पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर आपली चूक लपवण्यासाठी एक चावी जल्मी आणि दुसरी चावी आपल्या ताब्यात ठेवली. आणि आपल्या ताब्यातील चावी दुसऱ्या गटाला दिली. त्यातून एका वांगड्याने जल्मी येण्यापूर्वीच येऊन मंदिर उघडून पुजा केली, अशी तक्रार स्थानिकांनी केली.   

मामेदाराना याविषयी विचारल्यावर न्यायालयात जायला सांगतात. पैसे, सोने आणि मंदिराचा ताबा जी समिती बरखास्त झाली आहे; त्यांच्याकडे आहे. ज्या लोकांनी मंदिर उघडले त्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

हेही वाचा