
पणजी : गोव्यातील (Goa) तिवरे, वरगाव (Tivrem, Orgao Panchayat) पंचायतीचे (Panchayat ) सरपंच जयेश नाईक व उपसरपंच एकनाथ परब यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव (No confidance) दाखल करण्यात आला आहे. एकूण पाच पंच सदस्यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली आहे.
पंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, पंचायतीच्या प्रशासनात अफरातफर, विकासकामांना सहकार्य न करणे, पंचायत सदस्यांच्या बाबतीत हुकुमशाही व एकाधिकारशाहीचे वर्तन, या कारणांसाठी अविश्वास ठराव दाखल केल्याचे म्हटले आहे.
या अविश्वास ठरावावर अपर्णा आमोणकर, फ्रांसिस लोबो, सिद्धार्थ गाड, शिल्पा वेर्णेकर, सुमित्रा नाईक या पंच सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे.