सीसीटीव्हीत चार चोरटे असल्याचे समोर : दुकानदाराची माहिती

मडगाव: घोगळ, मडगावयेथील चौगुले महाविद्यालयानजीकच्याकृष्णा प्लाझा येथील एस.व्ही. ज्वेलर्सचेशटर तोडण्यात आले. दुकानदारानेदिलेल्या माहितीनुसार,सीसीटीव्ही फुटेजमधूनचार चोरटे असल्याचे दिसूनआले. फातोर्डा पोलिसघटनास्थळी दाखल झाले असूनतपास केला जात आहे.
घोगळ,मडगाव येथील कृष्णाप्लाझा येथील एस. व्ही.ज्वेलर्स हे सोन्याच्यादागिन्यांचे दुकान रविवारीरात्री फोडण्यात आले.चोरट्यांनी दुकानाचेशटर एका बाजूने तोडल्याचेदिसून आले.
एस.व्ही ज्वेलर्सचे मालकसुरेश कुर्डेकर यांनी सांगितलेकी, बुधवारपासूनआपण कुटुंबासह गावी गेलो होतो.रविवारी दुपारी गावाकडूनपरत आलो. त्यावेळीदुकानाची स्थिती चांगली होती.चोरी झाल्याचे दिसूनआले नव्हते.
सोमवारीसकाळी सोसायटीचे अध्यक्षांनीघराकडे येत दुकान फोडल्याचेदिसत असल्याची माहिती दिली.त्यानंतर दुकानातजाऊन पाहिले असता; दुकानाचेशटर तोडण्यात आल्याचे दिसूनआले.
सीसीटीव्हीकॅमेर्याच्या फुटेजमध्येचार व्यक्तींनी ही चोरी केल्याचेदिसून येत असून लोखंडी सळीघालून फोडताना दिसून येत आहे.दुकानाचे शटर उघडल्यानंतरआतील काही सामान चोरीला गेलेलेआहे का ते कळेल.
याठिकाणीघाऊक मद्यविक्रीचे दुकानअसले तरीही किरकोळ मद्यविक्रीकेली जाते. ते सर्वदुकानानजीक येऊन प्यायलाबसतात. त्यांच्यावरहीकारवाई होण्याची गरज व्यक्तकेली.
फातोर्डायेथे यापूर्वी दोन घरफोड्या
फातोर्डापरिसरात यापूर्वी दोन घरफोडीचेप्रकार समोर आलेले असून,पोलिसांनी गुन्हेहीनोंद केलेले आहेत. याचआठवड्यात 3 नोव्हेंबररोजी अंबाजी, फातोर्डायेथील प्रयांक मतिमान यांच्याघरात चोरी प्रकरणी अज्ञाताविरोधातगुन्हा नोंद करण्यात आला.
ही चोरी 19 ऑक्टोबरते 3 नोव्हेंबर याकालावधीत झाली होती व चोरट्यांनीदोन गॅस सिलिंडर, आठलाखांचे सोन्याचे दागिने असा8.60 लाखांचा मुद्देमालचोरी केला होता. त्यापूर्वी30 ते 31 ऑक्टोबरया कालावधीत मुंगूल ग्रँडपरिसरातील प्रीती लोटलीकरयांच्या घराचे प्रवेशव्दाराचेकुलूप तोडून चोरट्यांनी घरातीलसुवर्णलंकारासह 2.90 लाखांचामुद्देमाल चोरी केला होता.