पुढील वर्षापासून प्रक्रिया सुरू होणार

पणजी : गोव्यात (Goa) २०२७ च्या जनगणनेचा (2027 Census) एक भाग म्हणून ५ लाख घरांचे (5 lakh Houses) जिओटॅगिंग (Geo-tagging) केले जाणार आहे. इमारती, निवासी व अनिवासी असे ‘डिजिटल लेआउट मॅपींग (डीएलएम) (DLM) करणे १ एप्रिल, २०२६ पासून सुरू होणार आहे.
पहिल्यांदाच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ‘डिजिटल मॅपींग’ हाती घेण्यात येत आहे. जनगणनेचा एक भाग म्हणून हे काम हाती घेण्यात येत आहे. त्यात ५ लाखांहून अधिक घरे आणि इमारती जिओटॅग केल्या जाणार आहेत. इमारतींचे निवासी, अनिवासी, ‘अंशत: निवासी’ आणि ‘लॅंडमार्क’ अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. घरांची यादी करण्याच्या प्रक्रियेचा टप्पा, ज्यामध्ये जिओटॅगिंगचा समावेश आहे. १ एप्रिल, २०२६ रोजी सुरू होणार आहे व सप्टेंबर, २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. २०२७ मधील नियोजित भारतातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल जनगणनेचा एक भाग आहे. स्वगणना कार्यक्षमतेची चाचणी घेण्यासाठी सध्या राज्यातील दोन ठिकाणी जनगणना २०२७ पोर्टलची पूर्वचाचणी सुरू आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट गृहनिर्माण डेटाची अचूकता सुधारणे, जनगणना प्रक्रिया सुलभ करणे व चांगले शहरी नियोजन आणि कल्याणकारी योजनांच्या वितरणासाठी एक विश्वासार्ह स्थानिक डेटाबेस तयार करणे आहे.