बार्देश बाजारच्या निवडणुकीत एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल

आज, उद्या अर्जांची छाननी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
32 mins ago
बार्देश बाजारच्या निवडणुकीत एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल

म्हापसा : बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची येत्या दि. ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

१५ सदस्यीय संचालक मंडळातील सर्वसामान्य गटातील १२ संचालकपदांसाठी २० अर्ज, महिला राखीव दोन पदांसाठी ६ अर्ज सादर झाले आहेत, तर अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव असलेल्या संचालकपदासाठी एकही अर्ज सादर झालेला नाही. फक्त अक्षता शेजवळकर यांनी दोन अर्ज सादर केले आहेत.

सोमवार दि. १५ रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी ६ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडे एकूण २६ अर्ज सादर झाले. छाननीनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी सहकार खात्यातर्फे म्हापसा उपनिबंधक कार्यालयात अधिकारी रामेश्वर (रामा) दाभोळकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून, तर गोविंद ठाकूर यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
दि. १६ व दि. १७ रोजी ३ वाजेपर्यंत अर्जांची छाननी होईल. दि. १९ ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३.३० पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. दि. २२ रोजी अंतिम उमेदवारी यादी व निवडणूक चिन्ह दिले जाईल. दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक होईल. दि. ६ रोजी सकाळी १० वाजता म्हापसा उपनिबंधक कार्यालयात मतमोजणी होईल व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. मतदानाचे ठिकाण आणि मतदान केंद्राची व्यवस्था योग्य वेळी कळविली जाईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक नोटिसीत नमूद केले आहे.

यांनी सादर केले उमेदवारी अर्ज...

बापू रामा तुयेकर, जयवंत पांडुरंग नाईक, शशिकांत काशीनाथ कांदोळकर, रघुवीर नारायण देसाई, चंद्रकांत यशवंत शेटगावकर, रघुवीर वासू कोटकर, धर्मा वासुदेव चोडणकर, रवींद्र विष्णू फोगेरी, महादेव सारंगधर नाटेकर, विजय लक्ष्मण भिके, नारायण बाबुराव राटवड, एकनाथ विठ्ठल नागवेकर, प्रमोद रामनाथ कर्पे, सखाराम हरिश्चंद्र गावकर, अश्विन रमाकांत खलप, सुधीर रामा कांदोळकर, निखिलचंद्र रमाकांत खलप, अक्षता अभिजित शेजवळकर, पवन जयवंत नाईक व नितीन त्रिंबक नाईक. महिला राखीव पदासाठी पूनम जयवंत नाईक, अनुया गोकुळदास शिरोडकर, निर्मला रमाकांत खलप, प्रतीक्षा निखिलचंद्र खलप, अक्षता अभिजित शेजवळकर व पूजा जयवंत नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे.