काणकोण : दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत

अपघात ग्रस्त महिलेचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
काणकोण : दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत

पणजी : बोकडामळ-आगोंद,काणकोण येथे शुक्रवारी दुपारी १.३० वाजता घडलेल्या एका दुर्दैवी घटना घडली.  गेल्हेरमिना फर्नांडिस (५३) या  गाडीवरून तोल गेल्याने रस्त्यावर पडल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारादरम्यान गोमेकॉत त्यांचा मृत्यू झाला. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्हेरमिना फर्नांडिस या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून (ज्युपिटर स्कूटर) काणकोणहून अगोंदकडे जात होत्या. बोकडामळजवळ पोहोचल्यावर अचानक जोरदार वारा व पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी छत्री उघडली. मात्र, वाऱ्याचा जोर एवढा होता की छत्रीमध्ये जोरात हवा भरली आणि त्यामुळे त्यांनी तोल गमावला. गतीमान दुचाकीवरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.तिला उपचारासाठी आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर  दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढे त्यांना गोमेकॉत हलवण्यात आले. येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   

या प्रकरणी काणकोण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद  कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यू प्रकरण म्हणून करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामदास दोईफोडे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा