ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानच्या फसव्या दाव्यांचा पर्दाफाश!

पाकिस्तान फक्त सोशल मिडियावरच जिंकला-डॉनच्या फॅक्ट चेकिंगमध्येही स्पष्ट!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानच्या फसव्या दाव्यांचा पर्दाफाश!

इस्लामाबाद : भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला, पण भारतीय हवाई दलाने सर्व हल्ले निष्फळ ठरवले.



याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत एका बनावट इंग्रजी वृत्तपत्राची कटिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यामध्ये "पाकिस्तानचा हवाई दल आकाशाचा राजा" असा दावा करत पाकिस्ताने भरताला अद्दल घडवली असा दावा करण्यात आला होता. या बोगस बातमीचा आधार घेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत पाकिस्तानच्या हवाई दलाची स्तुती केली.

मात्र, पाकिस्तानच्या डॉन या प्रतिष्ठित वृत्तपत्राने याचे सत्य तपासून हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले. फर्जी बातमीत अनेक स्पेलिंगच्या चुका होत्या आणि त्या दिवशी मूळ वृत्तपत्रात असा कोणताही लेख छापलेला नव्हता. त्याचबरोबर, आणखी एक बनावट दावा व्हायरल करण्यात आला होता की, पाकिस्तानने उधमपूर एअरबेसवर हल्ला केला. या दाव्याचा व्हिडिओ खरेतर राजस्थानातील हनुमानगड येथील एका केमिकल फॅक्टरीला लागलेल्या आगीचा होता. पाकिस्तानने फसव्या बातम्यांच्या माध्यमातून जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्यांच्याच माध्यमांनी खरे सत्य समोर आणले आणि खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. 




हेही वाचा