जाणून घ्या वयोमर्यादा आणि पात्रता
नवी दिल्ली : ग्रामीण डाक सेवक (GDS) आणि इतर पदांच्या तब्बल ४४ हजार जागा लवकरच भरल्या जातील. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवार ३ मार्च २०२५ पासून अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मार्च २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
या पदांवर भरती
१) पोस्टमन
२) ग्रामीण डाक सेवक (GDS)
३) मेल गार्ड
४) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
५) सहाय्यक अधीक्षक
पगार:
पोस्ट ऑफिसचे बरेच विभाग आहेत आणि वेतन पोस्ट टू पोस्ट बदलते. ग्रामीण डाक सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना रुपये १४,००० ते रुपये २४,००० प्रति महिना पगार दिला जाईल. ज्या उमेदवारांना मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) फील्ड मिळाले आहे त्यांना रुपये १८,००० ते रुपये २२,००० प्रति महिना. पोस्टमनची नोकरी मिळालेल्या उमेदवारांना रुपये २१,७०० ते रुपये ६९,१०० प्रति महिना पगार मिळेल. त्याशिवाय अर्जदारांना TRCA, TAसह इत्यादी अतिरिक्त भत्ते दिले जातील.
शिक्षण :
- इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण केलेली असावी.
- गणित आणि इंग्रजी विषय सक्तीचे असावेत.
- शिवाय, उमेदवारांना संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे अर्ज करू शकता:
अर्ज करणे सोपे आणि सरळ आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा लागेल. उमेदवारांची निवड त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. पोस्टल सेवेतील काही उच्च पदांसाठी अर्जदारांना लेखी आणि मुलाखत परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर ज्या उमेदवारांचे नाव गुणवत्ता यादीत येते त्यांना कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी बोलावले जाते. आणि शेवटी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये जॉइन केले जाते. ही भरती देशभरातील विविध राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते.
- येथे क्लिक करून तुम्ही एकूण पदांची माहिती घेऊ शकता
- येथे क्लिक करून तुम्ही कोल्हापूर (गोवा) विभागातील पदे आणि लोकेशन तपासू शकता.
अधिकृत नॉटिफिकेशन आणि अर्ज लवकरच उपलब्ध होईल