शमिका साळगावकरला १ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्यपदक
म्हापसा : टीकेएजी (ट्रेडिशनल कराटे असोसिएशन ऑफ गोवा) राज्यस्तरीय कराटे स्पर्धा शनिवार, दि. २८ आणि रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी इनडोअर स्टेडियम म्हापसा-गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण गोव्यातून १ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत थिवी कराटे डोजोच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि कांस्य पदके मिळविली. कराटे स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना सेन्सी - संदेश संतोष कोळीकर (ब्लॅक बेल्ट ३ रा डॅन) थिवी आयजेकेएआय डोजोचे प्रशिक्षक यांच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यस्तरीय पदक विजेते
शमिका साळगावकर : १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक
पल्लवी कलंगुटकर : ३ सुवर्ण आणि १ कांस्य पदक
अंगजा चारी : १ रौप्य पदक
अन्विता बाणावलीकर : १ कांस्य पदक
सर्जिओ परेरा : १ रौप्य आणि १ कांस्य पदक
निशांत माळगी : १ रौप्य आणि १ कांस्य पदक
पार्थ वालावलकर : १ रौप्य पदक
मिथ : १ सुवर्णपदक
आदित्य सावंत : ३ कांस्य पदके