काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान अपघात, १८ जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th July, 01:05 pm
काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान अपघात, १८ जणांचा मृत्यू

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका खासगी विमान कंपनीचे विमान सकाळी टेक ऑफ करत असतांना कोसळले. विमानात १९ जण होते, त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.Kathmandu Plane Crash: काठमांडू विमान दुर्घटना में 5 लोगों की गई जान, जानें  पायलट समेंत बाकी की हालत | Kathmandu Plane Crash: 5 people died in Kathmandu  plane crash, know the condition

हे विमान पोखराला जात असताना सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या पायलटला रुग्णालयात नेण्यात आले आहे.  पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अपघातस्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. विमानातील आग विझवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. माहितीनुसार, पोखराकडे जाणारे विमान टेक ऑफच्या वेळी धावपट्टीच्या बाहेर गेल्याने हा अपघात झाला. विमानात चालक दलातील सदस्यांसह १९ जण होते.

जहाजाचा कॅप्टन एमआर शाक्य यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. या दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे.Nepal Plane Crash Update News: fire on Saurya Airlines plane

हेही वाचा