इन्फिनिटी किंग्जला टी-१०चे विजेतेपद

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th April, 12:06 am
इन्फिनिटी किंग्जला टी-१०चे विजेतेपद

पणजी : इन्फिनिटी किंग्जने रॉयल स्ट्रायकर्सचा पराभव करत टी-१० क्रिकेट प्रीमियर लीग २०२४चे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन आकाल वॉरियर्सतर्फे जीईसी मैदान, फर्मागुढी येथे करण्यात आले होते.

विजेत्या इन्फिनिटी किंग्जला चषक व रोख रक्कम तर उपविजेत्या रॉयलला चषक व रोख रक्कम देण्यात आली. सर्वाधिक षटकार आणि उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार धीरज गावडेला मिळाला तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनिमेश आकारकरला निवडण्यात आले. रामा गावडेला सर्वाधिक बळी, केदार गावडेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सुमीत गावडेला अमेझिंग खेळाडू, एकनाथ गावकरला मालिकावीर तर सोहम गावडेला अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

अंतिम सामन्याला पायनो गावडे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक प्रदान करण्यात आला. यावेळी आकार वॉरियर्सचे अध्यक्ष अजय खांडेपारकर, उपाध्यक्ष रोहिदास गावडे यांची उपस्थिती होती.