'केजरीवाल डिव्हाइसचा पासवर्डही सांगत नाहीत...' ईडीने केला आरोप, मागितली आणखी ७ दिवसांची कोठडी

राऊज एव्हेन्यू कोर्टात अरविंद केजरीवालांच्या कोठडीबाबत सुनावणी पूर्ण, न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th March, 02:56 pm
'केजरीवाल डिव्हाइसचा पासवर्डही सांगत नाहीत...' ईडीने केला आरोप,  मागितली आणखी ७ दिवसांची कोठडी

नवी दिल्ली: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातील रिमांड संपल्यानंतर, ईडीने गुरुवारी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर केले असून आणखी ७ दिवसांची कोठडी मागितली आहे. ईडीच्या वतीने एसव्ही राजू न्यायालयात युक्तिवाद केला. तर अरविंद केजरीवाल यांच्यावतीने रमेश गुप्ता हजर होते. सुनावणीवेळी सुनीता केजरीवालही कोर्ट रूममध्ये हजर होत्या. यादरम्यान एसव्ही राजू यांनी आरोप केला  की, 'मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल डिव्हाइसचे पासवर्डही उघड करत नाहीत. तसेच उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहेत. 

ईडीने कोर्टात सुनावणीदरम्यान सांगितले की, केजरीवाल यांना डिव्हाइसचा पासवर्ड विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ते सांगण्यास नकार दिला आणि वकिलांना विचारल्यानंतर ते सांगू, असे सांगितले. त्यांच्या रिमांडची मागणी करताना, ईडीतर्फे हजर असलेले वकील एसव्ही राजू म्हणाले की, केजरीवाल यांची आणखी काही लोकांना समोरासमोर बसून चौकशी करायची आहे.Delhi Liquor Scam: Curious Case Of The Missing Money Trail - Latest India  news, analysis and reports on IPA Newspack

ईडीचे आरोप 

- 'साऊथ ग्रुपकडून आम आदमी पक्षास १०० कोटींची रक्कम प्राप्त झाली. 

-हवालाच्या माध्यमातून गोव्याच्या निवडणुकीत पैसा वापरण्यात आला .  

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकोठडीबाबत सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे. यापूर्वी न्यायालयात ईडीने सांगितले की, मद्य धोरण  घोटाळ्यात १००  कोटी रुपयांची लाच मागितली गेली होती. एजन्सीकडे याचे सबळ पुरावे आहेत. दुसरीकडे, ईडी आम आदमी पार्टीचा समूळ नाश करू इच्छित आहे, असा दावा केजरीवाल यांनी न्यायालयात केला. केजरीवाल म्हणाले की, १००  कोटींची लाच घेतली असेल तर पैसे कुठे गेले? दरम्यान केजरीवाल यांच्या कोठडीबाबत सुनावणी पूर्ण सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.

हेही वाचा