साळगाव पठारावर बायोगॅस आधारित वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ३ कोटी मंजूर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th March, 10:08 am
साळगाव पठारावर बायोगॅस आधारित वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ३ कोटी मंजूर

पणजी : पीळर्ण औद्योगिक वसाहतीजवळ साळगाव पठारावर बायोगॅसचा वापर करून १.० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला ३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. न्यू अॅण्ड रेन्युएबल एनर्जी मंत्रालयाने हा निधी मंजूर केला आहे.

सीएफएअंतर्गत १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ठरल्याप्रमाणे वरील निधी मंजुरी देण्यात आली आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शहरी, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून अर्थात बायोगॅसपासून ऊर्जेचीनिर्मिती करण्याचा उपक्रम केंद्र सरकारने यापूर्वीच सुरू केला आहे. याच उपक्रमाअंतर्गत साळगाव पठावरावर बायोगॅसवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपतींकडून निर्देश आल्यानंतर या निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा