पणजी : गोवा विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत डॉन बॉस्को कॉलेजने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा विद्यापीठाच्या ज्युबिली हॉल, ताळगाव पठार १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. व्ही.एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉ, मिरामारने उपविजेतेपद तर डीएम कॉलेज आणि रिसर्च सेंटर, आसगावने तिसरा क्रमांक पटकावला.
फातोर्डा येथील डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या भास्कर गेनने ‘गोवा युनिव्हर्सिटी श्री’ २०२३-२४ चा किताब पटकावला.
बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.गणेश सोमयाजी, डीन, डी.डी. कोसंबी स्कूल ऑफ सोशल सायन्स अँड बिहेवियरल स्टडीज, गोवा विद्यापीठ, भालचंद्र बी. जादर, सहाय्यक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली.
सविस्तर निकाल पुढिलप्रमाणे:
६० किलो आणि त्यापेक्षा जास्त: सुवर्ण: रजत गाडेकर (डीएमसीआर आसगाव), रौप्य : प्रणेश साळगावकर, (श्रीदोरा काकुलो कॉलेज, म्हापसा), कांस्य : गुरुप्रसाद घाडी (धेंपे कॉलेज, मिरामार.
६५ किलो आणि त्यापेक्षा जास्त: सुवर्ण: प्रतीक गवस (डॉन बॉस्को कॉलेज, पणजी), रौप्य: सोहन नाईक (सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा), कांस्य: नारायण बखले, (कारे कॉलेज ऑफ लॉ, मिरामार).
७० किलो आणि त्यापेक्षा जास्त: सुवर्ण: कृष्णराज एन. केरकर (मांद्रे कॉलेज, मांद्रे), रौप्य : रोहित गोप (धेंपे कॉलेज, मिरामार), कांस्य: गीतेश कांबळी (डीएमसीआर, आसगाव).
७५ किलो आणि त्यापेक्षा जास्त: सुवर्ण: सुनील बेगर (डॉन बॉस्को कॉलेज, पणजी), रौप्य: केगुन फेर्राव (व्हीएमएस कॉलेज ऑफ लॉ, मिरामार) कांस्य: प्रशांत गवांदर (विद्या प्रबोधिनी कॉलेज, पर्वरी).
८५ किलो आणि त्यापेक्षा जास्त: सुवर्ण: भास्कर गेन (डीबीसीई फातोर्डा) रौप्य: विश्वेश गोवेकर (व्ही.एम.एस कॉलेज ऑफ लॉ, मिरामार) कांस्य: संजीव रेवोडकर (डीएमसीआर आसगाव).
८५ किलोपेक्षा जास्त: सुवर्ण: आशुतोष केरकर (व्हीएमएस कॉलेज ऑफ लॉ, मिरामार) रौप्य: लिसँडर अराऊजो (जी.सी. हॉस्पिटॅलिटी, सिदादे दा गोवा) कांस्य: अभिषेक परब (श्रीदोरा काकुलो कॉलेज, म्हापसा).