गोव्याची श्रीमंती म्हणजे आमची संस्कृती : गावडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th March 2023, 12:30 am
गोव्याची श्रीमंती म्हणजे आमची संस्कृती : गावडे

पेडणे : शिमगोत्सवातील संस्कृती ही आमची खरी श्रीमंती आहे. या श्रीमंतीच्या बळावर संस्कृतीचे जतन करत असताना ती कला गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
उदर्गत संस्था मांद्रे यांनी मांद्रे पंचायत क्षेत्रात सलग चार दिवस आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यातून शिमगोत्सव मिरवणूक आयोजित केली होती. १८ रोजी श्री भगवती देवी आणि श्री सप्तेश्वर देवाला शिमगोत्सवानिमित्ताने श्रीफळ ठेवून या शिमगोत्सवाची सुरुवात मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, अॅड. सिद्धी आरोलकर, आयोजन समितीचे अध्यक्ष मुकेश सावंत, दयानंद मांद्रेकर, नाना सोपटे केरकर, सागर तिळवे, अनंत शेटगावकर, पंच फटु शेटगावकर उपस्थित होते.
कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा शिमगोत्सवाचे आयोजन आमदार जीत आरोलकर यांनी केल्याबद्दल मंत्री गोविंद गावडे यांनी समाधान व्यक्त केले. हा शिमगोत्सव केवळ गोव्यात नव्हे तर जगभरात पोहोचलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढच्या वर्षी गोवा पातळीवर सरकारच्या माध्यमातून हा शिमगोत्सव आयोजित केला जाईल, असा विश्वास जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.