Goan Varta News Ad

सरकारच्या वरदहस्तानेच गोव्यात मटका !

गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांची टीका

|
22nd June 2021, 11:46 Hrs
सरकारच्या वरदहस्तानेच गोव्यात मटका !

किरण कांदोळकरप्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : राज्यातील मटका बंद करण्यासाठी मटकेकार हवेत ना? मग दक्षिण गोव्यातील एका मोठ्या मटकेकारचा उद्योग प्रथम मुख्यमंत्र्यांनी बंद करावा. राज्यात ‘गोवा मेन’ नावाचा मटका सरकारच्या वरदहस्तानेच सुरू आहे, असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केला आहे.
कोलवाळ येथे महामार्गाच्या पाहणीवेळी माजी आमदार किरण कांदोळकर पत्रकारांशी बोलत होते. हल्लीच कोलवाळ पोलिस स्थानकाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या भागातील मटकेकारांनी आता सावध राहावे, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कांदोळकर यांनी वरील आरोप केला आहे. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले आहे, ते आपण ऐकले आहे, ते आपल्याला उद्देशून केले आहे, असे मला वाटत नाही. पण, त्या वक्तव्यातून गोव्यात मटका सुरू असल्याचे मुख्यमंत्री मान्य करत आहेत. अप्रत्यक्षरीत्या ते आपल्याच खात्यावर टीका करत आहेत, असा टोला कांदोळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर हाणला.
थिवीमध्ये पोलिस स्थानक आणले म्हणून आमदार धमकीची भाषा बोलत आहे. दक्षिण गोव्यात रासुका लावले आहे. तसेच थिवीमध्ये पोलिस स्थानक आणले म्हणून आम्ही थिवीवासीय कधीच घाबरणार नाहीत. तर जनमत चोरल्याच्या आरोपावरून थिवीवासीय आमदारांवरच तक्रार गुदरण्यास तयार आहेत. थिवीतील लोकांनी काँग्रेस पक्षाला जनमत दिले होते. हे जनमत या आमदाराने चोरले असून ते चोर आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोलवाळ पोलिसांत लगेच तक्रार दाखल केली जाईल.

गोमेकॉमध्ये जे लोक ऑक्सिजनअभावी मरण पावले आहेत. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस व सामाजिक संस्थांनी तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारींची प्रथम चौकशी या सरकारने करावी. _किरण कांदोळकर, कार्याध्यक्ष, गोवा फॉरवर्ड