Goan Varta News Ad

नोटिसीला उत्तर देण्यासाठी मनोज परब यांना मुदतवाढ

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती

|
23rd April 2021, 12:44 Hrs
नोटिसीला उत्तर देण्यासाठी मनोज परब यांना मुदतवाढ

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांच्या विरोधात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती व गुरुवार, दि. २२ रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परब यांनी नोटिसीला उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. याची दखल घेऊन पुढील सुनावणी ३ जून रोजी ठेवण्यात आली आहे.
उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी परब यांना २२ रोजी उपस्थित राहण्यासाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या नोटिसीत परब यांच्या विरोधात पाच दखलपात्र आणि एक चॅप्टर केस असल्याची नमूद करण्यात आले होते. परब शांतता भंग करत असल्याचे नोंद करण्यात आले आहे. परब यांनी गुरुवारी उपस्थित राहून नोटिसीला उत्तर देण्यासाठी मुदत मागितली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सुनावणी ३ जून रोजी ठेवली आहे.