
पैंगीण : श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या (Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math) ५५० वर्षपूर्तीनिमित्त सुरू असलेली श्रीराम दिग्विजय रथ यात्रा शेवटच्या टप्यात असून, आज बुधवारी दुपारी रथ यात्रा मोर्खड, काणकोण (Cancona) येथे पोचली.
मोखर्ड-काणकोण येथील श्री अश्वत्थ नारायण देवालयात मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी शिरीष पै,राजू केंकरे, गोविंद शेणवी, वैभव शेणवी, रमाकांत प्रभुगावकर, वंदना प्रभुगावकर, विवेक शानबाग, प्रसाद प्रभू, राजेद्र इत्यादी उपस्थित होते.
दुपारी मोखर्ड येथे थांबून रथा यात्रा सादोळशे येथील श्री मोहिनी देवालयाला भेट देणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात पोचणार आहे. याठिकाणी परम् पूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी रथ यात्रेचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर श्रीराम द्विग्विजय यात्रेची सांगता होणार आहे.