गोव्यात पर्यटकांना तक्रारींसाठी सोशल मिडिया ठरू लागले प्रभावी : स्थानिकांकडूनही वापर

Story: आग्नेलो पेरेरा।गोवन वार्ता |
4 hours ago
गोव्यात पर्यटकांना तक्रारींसाठी सोशल मिडिया ठरू लागले प्रभावी : स्थानिकांकडूनही वापर

पणजी : गोव्यात (Goa) आलेले त्रासदायक अनुभव सांगण्यासाठी पर्यटक (Tourist) आता सोशल मिडियाचा (Socil Media)  वापर करू लागले आहेत.

गेल्या काही सप्ताहात पर्यटकांनी या माध्यमांचा वापर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात छळ, धमकी, जास्त पैसे आकारणे व इतर काही घटनांचा समावेश आहे. 

पर्यटकांनी अपलोड केलेले व्हिडिओ, पोस्ट पोलिसांचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत. त्यानुसार पोलीसही पुढील कारवाई करीत आहेत. 

एक नवीन इकोसिस्टम उदयास येत आहे जिथे अधिकृत सरकारी यंत्रणा नसून, इंस्टाग्राम पर्यटकांसाठी सहाय्यभूत ठरत आहे. 

व्हायरल तक्रारींचा प्रकार

हल्लीच घडलेले प्रकरण म्हणजे पर्यटक सौम्या खन्ना, यांनी टाकलेले व्हिडिओ होत. तिने अश्लील टिपण्या करन त्रास दिलेल्या युवकांचे तपशीलवार व्हिडिओ शेअर केले होते.

परदेशी नागरिक समजून तिची सतावणूक केली होती. या पोस्टमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 

नंतर गोवा पोलिसांच्या (Goa Police) सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने (Social Media Monitoring Cell)  थेट तिच्याशी संपर्क साधून कारवाई करण्यासाठी सविस्तर तपशील मागितला होता. 

त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राजस्थानमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती व इतरांचा शोध घेतला जात आहे. 

यासंदर्भात माहिती देताना उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी असे वर्तन सहन केले जाणार नसल्याचे सांगितले. 

"गोवा पोलिस प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतात, विशेषतः पर्यटकांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारी जेव्हा आमच्या लक्षात येतात तेव्हा आम्ही त्यांची त्वरित पडताळणी करतो आणि कारवाई सुरू करतो," असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच, हरमल समुद्रकिनाऱ्यावर एक गट दोन परदेशी महिलांभोवती जबरदस्तीने हात ठेवून त्यांचे फोटो काढतानाचा आणखी एक व्हिडिओ प्रसारित झाला.

त्यानंतर पर्यटक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि कर्नाटकातील तीन इसमांना भारतीय न्याय संहितेअंतर्गत विनयभंगाशी संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली.

आणखी एका वेगळ्या प्रकरणात, जर्मन प्रवासी अलेक्झांडर वेल्डर यांनी टॅक्सीत ज्यादा दर आकारले जात असल्याची माहिती शेअर केली.

रिक्षा चालकाने ५०० रुपये मागितल्याचे व  गोवामाइल्सचे दर ३०० रुपये असल्याचे नमूद केले.

मात्र, गोवा माइल्सचे बुकींग त्या परिसरात बंद होते, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला व माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. 

स्थानिकांकडूनही वापर 

 गोव्यात पर्यटक व स्थानिकही तक्रारी मांडण्यासाठी  त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यांचा वापर करीत आहेत. आणि एक नवा ट्रेंड वाढत आहे.

पर्यटकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी समर्पित कोणतेही अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म नसल्यामुळे, इंस्टाग्राम आणि ट्वीटर हे वास्तविक हेल्पलाइन बनले आहेत.

गोवा कॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांनी सांगितले की, या नवीन ट्रेंडमुळे दीर्घकालीन धोरणात्मक पोकळी उघड होते.

"पर्यटकांकडे ग्राहक म्हणून पाहिले पाहिजे आणि प्रत्येक ग्राहकाला संरचित अभिप्राय प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे.

आपण अभ्यागतांना आमंत्रित करू शकत नाही आणि त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी अशी अपेक्षा करू शकत नाही," असे ते म्हणाले.

मार्टिन्स यांनी निदर्शनास आणून दिले की, परदेशी लोकांशी संबंधित अनेक घटनांची नोंद केली जात नाही कारण त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी कोणतीही सुलभ प्रणाली नाही.

पर्यटक आणि स्थानिकांसाठी एक अधिकृत सोशल मीडिया तक्रार प्लॅटफॉर्म तयार करणे, संबंधित विभागांकडे तक्रारी पाठवण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करणे आणि प्राप्त तक्रारी आणि केलेल्या कारवाईचे तिमाही अहवाल प्रकाशित करणे, पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करणे आवश्यक असल्याचे मार्ट‌िन्स म्हणाले. 

हेही वाचा