सागर कवच मोहिमेसाठी जाताना घडला अपघात

म्हापसा : गोव्यातील (Goa) मांद्रे (Mandrem) येथील म्हारिंगण मंदिराजवळ झालेल्या स्वयंअपघातात शुभानंद गडेकर (४६, शिरगाळ, धारगळ) पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) मृत्यू पावला. दुचाकीवरून ड्यूटीवर जात असताना अपघात घडला.
शिवोली किनारी पोलीस (Siolim Coastal Police) स्थानकात सेवा बजावत होता. आज सागर कवच मोहीम असल्यामुळे तो दुचाकीवरून आश्वे- मांद्रे समुद्रकिनारी ड्युटीवर जाताना हा अपघात घडला.
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे घटनास्थळी असलेल्या दुचाकी दुरुस्ती करण्यात येत असलेल्या गॅरेजमध्ये त्याची दुचाकी घुसली व तो जखमी झाला. तुये इस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मांद्रे पोलिसांनी पंचनामा केला पुढील तपास पोलीस करत आहेत. अपघातात सहकारी गमावल्याने पोलिसांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.