काशिनाथ शेट्ये यांच्या तक्रारीकडे कानाडोळा; तीन एसपी, एका पीआयला न्यायालयाची नोटीस

पुढील सुनावणी २१ जुलैला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
काशिनाथ शेट्ये यांच्या तक्रारीकडे कानाडोळा; तीन एसपी, एका पीआयला न्यायालयाची नोटीस

पणजी : आरटीआय कार्यकर्ते (RTI worker)  काशिनाथ शेट्ये यांनी गुन्हे शाखेकडे केलेल्या तक्रारीवर कारवाई न केल्याने त्यांनी पणजी प्रथमवर्ग न्यायालयात (JMFC Court Panjim) धाव घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयाने तीन पोलीस अधीक्षक व एका पोलीस निरीक्षकाला नोटीस बजावली आहे. 

 नोटीस बजावलेल्यांत राहुल गुप्ता (गुन्हा शाखा), जीवबा दळवी व हरिश्चंद्र मडकईकर या तीन पोलीस अधीक्षकांचा व पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांचा समावेश आहे.  काशिनाथ शेट्ये यांनी गुन्हे शाखेकडे केलेल्या तक्रारीत योगेश तिगडी, पीएसआय संकेत पोखरे, पीआय गौरीश मळीक यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, भ्रष्टाचार आणि पोलीस अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणात गुन्हा शाखेने काहीच न केल्याने शेटये यांनी पणजीतील प्रथमवर्ग न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणात न्यायालयाने आता वरील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे.

हेही वाचा